वैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता 

वैद्यकीय तपासणीनंतरच निवडणूक कामांतून मुक्तता 

मुंबई - निवडणुकांच्या कामातून सुटका मिळवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करतात; मात्र यापुढे त्यांना तसे करता येणार नाही. वैद्यकीय मंडळाने केलेल्या तपासणीनंतरच त्यांची या कामातून मुक्तता होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अशा शिक्षकांना दणका बसला आहे. 

आयोगाच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने आयोगाने नियमांमध्ये बदल केले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात राज्यात विविध निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या कामांतून शिक्षकांना सुटका मिळवू इच्छिणाऱ्या शिक्षकांना वैद्यकीय मंडळाच्या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. या तपासणीनंतर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. त्यामुळे शिक्षकांना आरोग्य बिघडल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करताना विचार करावा लागणार आहे. 

शिक्षक निवडणूक आयोगाचे नव्हे; तर शाळेचे कर्मचारी असतात. त्यांना सुटी देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना असतात. सरकारी अनुदान न मिळणाऱ्या शाळांतील शिक्षकांना निवडणुकांच्या कामाची सक्ती करणे योग्य नाही. असे आयोगाला नियम लादायचे असल्यास त्यांनी सर्व शिक्षकांना सरकारी कर्मचारी म्हणून जाहीर करावे. 
- प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com