...अन् फिर्यादीच निघाले चोर

...अन् फिर्यादीच निघाले चोर

संगमनेर : एटीएममधील भरणा रक्कम लुटीतील तीन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात आली. अधिक तपास केल्यानंतर फिर्यादीच चोर असल्याची माहिती समोर आली.

संगमनेर एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात चार व्यक्तींनी
त्यांच्याकडील 36 लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग गुरुवार (ता. १०) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास वडगाव लांडगा
शिवारात लुटल्याची फिर्याद  संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात मंगेश रमेश लाड (वय २९) रा. चास, ता सिन्नर, जि. नाशिक याने दिली होती. मात्र, फिर्याद  देणारे दोन कर्मचारी व त्यांचा एक साथीदार यांनीच बनाव करुन, पैसे लुटल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, फुटलेल्या रकमेपैकी ३२ लाख ९४ हजार रुपये आरोपींकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सिस्को या नाशिकच्या कंपनीसाठी संगमनेर व अकोले तालुक्यातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम मंगेश रमेश लाड व दत्ता सोनू पांडे ( वय ४०) रा. घुलेवाडी, सुमारे दहा वर्षांपासून करतात. त्यांना कंपनीकडून कमी वेतन मिळत असल्याने हे काम सोडण्यापूर्वी मोठा हात मारण्याच्या उद्देशाने त्यांनी पांडे याचा रिक्षाचालक असलेला पाहुणा सीताराम सुभाष शिंदे (वय ४० ) रा. इंद्रायणी कॉलनी, घुलेवाडी) याच्या मदतीने चोरीचा बनव रचला होता.

पोलिसांनी पुणे, नाशिक जिल्ह्यात नाकाबंदी केली होती. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत, तपासकामी सूचना दिल्या होत्या. पोलिसांना फिर्यादींचे जबाब व सीसीटीव्ही फुटेजमध्ये तफावत आढळल्याने सखोल तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लुटीनंतर सीताराम सुभाष शिंदे पैसे घेऊन जुन्नर तालुक्यातील आपटाळे येथे बहिणीच्या घरी गेला होता. पोलिस पथकाने त्याच्या पत्नीला सोबत
घेत रात्रीच आपटाळे येथून शिंदे याला ताब्यात घेतले. या आरोपींनी दोन महिन्यांपूवीं स्टेट बँकेतून ३ लाख ४ हजार रुपयांची रक्कम काढली होती. ती त्यांनी एटीएममध्ये भरल्याचे सांगितले. या प्रकरणी फिर्यादी मंगेश लाड व दत्ता पांडे हे मुख्य आरोपी निष्पन्न झाले.

या प्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, सहायक फौजदार अनिल मोरे व त्यांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी कौशल्याने केलेला तपास व हालचालीमुळे चोरीला गेलेली सर्व रक्कम अवघ्या १२ तासांत हस्तगत करण्यात यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com