ग्रामीण भागात भाजपला आघाडीचे आव्हान

ग्रामीण भागात भाजपला आघाडीचे आव्हान

मुंबई - सत्ताधारी भाजपला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आव्हान राहणार आहे. सुमारे १९० विधानसभा मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांची ताकद भाजपच्या उमेदवारांपेक्षा जास्त असणार असल्याचे चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आकडेवारीवरून सिद्ध होते.

राज्यात २०१४ मध्ये लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.त्यानंतर विविध टप्प्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांत भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. सत्ताधारी आणि मोदी यांची लाट म्हणून राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला फायदा झाला. मात्र चार वर्षांत बराच बदल झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आगामी २०१९  मधील निवडणुका आघाडीने लढण्याची घोषणा केली असून, त्यादृष्टीने जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. तर युतीसाठी भाजप शिवसेनेच्या मागे लागला आहे. याबरोबर भाजपची देशभरातील हवा ओसरली आहे.शेतकऱ्यांसह विविध समूहांच्या मोर्चांनी सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती केली आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीची संख्या भाजपपेक्षा खूप मोठी आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेचे चित्र
२०१४ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत १६ टप्प्यांत  झालेल्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या एकूण निवडणुका- ३३२ 
पंचायत समिती : निवडणूक झालेले तालुके (२८८): भाजप- ८७१, काँग्रेस- ६८९, राष्ट्रवादी - ५९३, शिवसेना-६२९
जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे तालुके (२९२): भाजप- ४२१, राष्ट्रवादी- ३७०, काँग्रेस- ३०९, शिवसेना- २९७

भाजपला जाणीव
शिवसेनेबरोबरची युती होणे भाजपला महत्त्वाचे आहे. कारण एकट्या भाजपला आघाडीबरोबर सामना करणे अवघड असल्याचे आकडेवारीवरून कळते. शिवसेनेला सोबत घेतले तर आघाडीविरोधात ग्रामीण भागात आव्हान देणे सोपे होईल, याची जाणीव भाजपला आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com