विधानसभेसाठी भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा?

विधानसभेसाठी भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा?

मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भाजपने विधानसभेला डावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश आज येथे दिले.

गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे. त्या बैठकीत पांडे यांनी ही घोषणा दिली आहे. या घोषणेमुळे 2014 च्या विधानसभेचे चित्र निर्माण होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात 288 जागांवर भाजपच निवडून येईल, अशी तयारी करा, असे आवाहन भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी केले. तर आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत 50 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेच महत्वाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले यामुळेच 2014 जिंकलो आता लोकसभा जिंकलो आणि विधानसभाही जिंकणार असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

मी पुन्हा येईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर लागले आहेत. 'मी पुन्हा येणार' असे. यावरून मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे सिद्ध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com