जेईई मेनच्या परीक्षेचे अर्ज उपलब्ध

JEE
JEE

वाटा करिअरच्या

शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यंदा प्रथमच जेईई मेन 2019 परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. पहिली परीक्षा यापूर्वीच झालेली असून, दुसरी परीक्षा एप्रिल 2019मध्ये होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर 7 मार्च 2019पर्यंत उपलब्ध आहेत. परीक्षा 7 ते 20 एप्रिल या कालावधीत प्रत्येक दिवशी दोन शिफ्टमध्ये फक्त ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

अर्जामध्ये चुका झाल्यास त्या सुधारण्याची, करेक्‍शनची संधी 11 ते 15 मार्चपर्यंत, तर ऍडमिट कार्ड संकेतस्थळावर 20 मार्चपासून उपलब्ध होतील. यापूर्वी ज्यांनी पहिली जेईई मेन जानेवारी 2019 परीक्षा दिलेली आहे, ते सर्व दुसरी परीक्षा देऊ शकतात. अर्थातच दुसरी परीक्षा देणे बंधनकारक नाही. ज्यांनी पहिली परीक्षा दिली नाही, त्यांनी मात्र दुसरी परीक्षा दिलीच पाहिजे. दोन्ही परीक्षांतून "बेस्ट ऑफ टू' स्कोअर मेरिट क्रमांकासाठी गृहीत धरला जाईल.

पेपर 1 - बीई, बीटेकचा निकाल 30 एप्रिल, तर पेपर -2- बी.आर्च., बी. प्लॅनिंगचा निकाल 15 मे रोजी जाहीर होईल. पूर्वी पहिल्या परीक्षेचा फॉर्म भरलेला नसलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. माहिती पत्रकाचा अभ्यास करून सर्व माहिती संकलित करावी. पालकांचा, आई-वडिलांचा व्यवसाय, उत्पन्न व शिक्षण याची माहिती तयार ठेवावी. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (चष्मा वापरत असल्यास तो घातलेलाच पाहिजे), 50 ते 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चेहरा दर्शविणारा व फोटोखाली नाव, फोटो काढल्याचा दिनांक आवश्‍यक.
फॉर्म कोणत्या कोर्ससाठी म्हणजेच पेपर-1, पेपर -2 किंवा दोन्हींसाठी भरावयाचा आहे का, तसेच ऑनलाइन पेमेंटचे डिटेल्स तयार ठेवावेत.
अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती व्यवस्थित भरावी. त्यानंतर फोटो व स्वाक्षरी अपलोड करून झाल्यानंतर सर्व अर्ज तपासावा. पेमेंट केल्यानंतर कन्फर्मेशन पेजची प्रिंट घ्यावी. ती प्रिंट, पेमेंट केल्याचा पुरावा, तसेच अपलोड केलेल्या फोटोप्रमाणेच 7 ते 8 फोटो पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी जपून ठेवावेत.

केंद्रीय नियमानुसार आरक्षण असून, अनुसूचित जाती, जमातीसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. ओबीसी- एनसीएलमधून नोंदणी करताना आई-वडिलांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी म्हणजेच प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअर दाखला आवश्‍यक. त्याचबरोबर ओबीसीच्या सेंट्रल लिस्टमध्ये आपल्या जातीचा समावेश आवश्‍यक असून, प्रवेशासाठी तसा दाखला मिळवावा. एसईबीसी आरक्षण फक्त महाराष्ट्रापुरते असून, त्यांनी ओबीसी एनसीएलमधून फॉर्म भरू नये. जेईई मेन जानेवारी 2019 व एप्रिल 2019 या दोन्ही परीक्षेचा स्कोअर विलीन करून "बेस्ट ऑफ टू'नुसार अंतिम मेरिट लिस्ट- रॅंक दिला जाईल व त्यानंतर आवश्‍यकतेनुसार पात्र विद्यार्थ्यांची जेईई ऍडव्हान्ससाठी निवड केली जाईल.

(लेखक हे प्रवेश, करिअर मार्गदर्शक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com