मध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात मुसळधारचा अंदाज

पुणे - मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला. पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी (ता. २३) पावसाच्या एक-दोन सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात दाये चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाबरोबर आलेल्या बाष्पमुळे विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा इशारा देण्यात आला आहे. तर, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने गुरुवारी कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस पडला. 

चोवीस तासांमध्ये ११.८ मिलिमीटर पाऊस
पुण्यात येत्या शनिवार (ता. २२) आणि रविवार (ता. २३) पावसाच्या हलक्‍या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता ५१ ते ७५ टक्के आहे, अशी माहिती हवामान खात्याने शुक्रवारी दिली. पुण्यात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १ जूनपासून आतापर्यंत ४३७ मिलिमीटर पाऊस झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com