मला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर

मला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर

नगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16) स्पष्ट केले. त्याचबरोर राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेसाठी पाच जागा हव्या आहेत. पाच जागांसाठी राष्ट्रीय लोकशाहीकडे आग्रही असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकर म्हणाले की, नगर लोकसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच असल्याची ग्वाही देताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी रालोआकडे लोकसभेसाठी पाच जागांचा आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पुढे ते म्हणाले की, बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ आहे. बारामतीसह माढा, अहमदनगर दक्षिण, परभणी, हिंगोली मतदारसंघातून मी निवडणूक लढवू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. येणारे सरकार केंद्रात आणि राज्यात भाजपचे असणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com