आंतरराष्ट्रीय पशू मेळाव्यास प्रारंभ

pushakar.jpg
pushakar.jpg

पुष्कर : आंतरराष्ट्रीय पशू मेळाव्यास शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. भारतासह जगभरातून पर्यटकांनी उपस्थिती लावली.  मेळा मैदानात ध्वजारोहनानंतर आंतरराष्ट्रीय नगारावादक नथूलाल सोलंकी यांनी राजस्थानी लोकसंगीताच्या साथीने नगारा वादन सादर केले. सायंकाळी मेळा मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपट गायक यांच्या गायन झाले.

सरोवर परिसरात विविध चित्र व रांगोळया
सरोवर परिसरातील 52 घाटांवर रोषणाई करण्यात आली होती. संपुर्ण परिक्रमा मार्गावर शालेय विद्यार्थींनीनी प्रबोधनात्मक चित्र व रांगोळया काढल्या होत्या. पर्यटकांना हे संदेश आकर्षित करित होते. स्वछ भारत, मतदानाचा पवित्र अधिकार असुन सर्वानी मतदान केले पाहिजे या अनुषंगाचे विविध संदेश चित्रांच्या व रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले होते.

बलून फेस्टीवल व उंट, घोडे विक्री आकर्षण
पुष्कर मेळाचे मुख्य आकर्षण येथे होणारा बलून फेस्टीवल व पशू मेळ्यामध्ये होणारी उंट व घोडे यांची खरेदी विक्री. 50 हजार पासुन 2 ते 3 लाख पर्यंत या उंट व घोड्यांच्या किंमतीत व्यवहार होतात. बलून फेस्टीवल सायंकाळच्या संधी प्रकाशात सुरु होतात व रात्री उशिरापर्यंत हे बलून आकाशात सोडले जातात.  

धार्मिक मेळ्य़ाला एकादशी पासुन प्रारंभ
कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशी पासुन पहिले पंचतीर्थ महास्नानास प्रारंभ होईल. पाच दिवस हा धार्मिक मेळावा चालतो. याकाळात लाखो भाविक पुष्कर सरोवरात स्नान करुन येथील मंदिरामध्ये प्रार्थना करतात. हे पंचतीर्थ स्नानाची समाप्ती कार्तिक पोर्णिमेला होईल.

''गेल्या तीन वर्षापासून भारतात येते आहे. याआधी पुष्कर व जयपूरला भेट दिली आहे. मला मुंबईला फिरायला आवडते. पुष्कर मेळाव्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.''
- आनियान, पर्यटक (दक्षिण अमेरिका) 

''मला भारतात फिरायला आवडते. मी 4 ते 5 वर्षातून एकदा भारतात फिरायला येतो. पण येथे जो आर्थिक भेदभाव केला जातो (उदा. भारतीयांसाठी 100 रुपयात तर परदेशींसाठी 200 रुपये) ही गोष्ट सोडली तर मला भारतात यायला कायम आवडते.''
- स्टीफन, पर्यटक (फ्रान्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com