वाटेल ते करा; पण वकील हजर करा - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

कोल्हापूर - ‘‘काय वाट्टेल ते करा; पण वकील हजर करा,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळासमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘‘सोमवारी (ता.१४) समितीचे दोन सदस्य माझ्याकडे या. मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी चर्चा करू,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्यवर्ती एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांची आज सायंकाळी भेट घेतली. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्‍नी सध्या सुरू असलेल्या दाव्यासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, की खंडपीठ बदलले की अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच वकील तारखेला हजर न राहिल्यास अडचणींना सामोरे जावे लागेल. तूर्तास सर्व काही अनिश्‍चित असेच आहे.  त्यावर पवार यांनी, वकील हरीश साळवे हे दिल्लीत असतात, असे सांगून ‘‘पुढच्या तारखेला काय वाट्टेल ते करा; पण वकिलांना हजर करा,’’ अशी सूचना केली. ‘‘सोमवारी सकाळी दोन माणसे माझ्याकडे या. आपण यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,’’ असे सांगितले. यानंतर दळवी यांनी दाव्याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सीमाप्रश्‍नी ८ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.  गेली १४ वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित आहे.’’

समितीचे मुख्यमंत्री निमंत्रक आहेत. त्यांनी या प्रश्‍नी लक्ष न घातल्यास त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. कर्नाटक सरकारने याकामी अधिकारी दिला आहे. सीमाप्रश्‍नी शरद पवार यांना जाण आहे. प्रश्‍न समजून घेण्यात त्यांच्याइतकी क्षमता कुणाच्यातच नाही. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली.
- दीपक दळवी, अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com