महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २८ जानेवारीपासून

Startup
Startup

मुंबई - राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

‘स्टार्ट अप सप्ताहा’मुळे इच्छुक स्टार्टअपना त्यांच्या अभिनव संकल्पनांच्या सादरीकरणासाठी नामी संधी उपलब्ध होणार असून यामुळे थेट शासनासोबत काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा या उपक्रमाची सुरवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी तब्बल ९०० स्टार्टअप या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, येत्या २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषणविरहित ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रांतील स्टार्टअपनी अर्ज ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’कडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०१९ असून इच्छुक स्टार्टअप www.mahastartupweek.msins.in याठिकाणी अर्ज करू शकतात. तसेच, www.twitter.com/MSInSociety,www.facebook.com/MSInSociety येथे फॉलो करू शकतात.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शन, कार्यशाळा, व्हेन्चर कॅपिटलिस्टस यांना भेटण्याची संधी, समिती चर्चा, नेट्‌वर्किंग इव्हेंट्‌स, व्याख्यानमाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com