मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी (ता. २१) मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुण्यातही पावसाच्या एक ते दोन सरी पडतील, असा अंदाज आहे.

दरम्यान, पुणे शहरात बुधवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. त्यामुळे सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण, कात्रजसह परिसरात पावसाळी वातावरण होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून वाढलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअसने कमी होऊन २८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुण्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ४९७.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ४२४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com