आईनेच केला मुलाचा खून 

आईनेच केला मुलाचा खून 

पोफळी (जि. रत्नागिरी) : पोफळी-पवारवाडी येथील तरुणाचा त्याच्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला. 

पोफळीच्या माजी सरपंच राजश्री राजाराम पवार यांचा मुलगा विक्रांत (वय 23) पवारवाडी येथील त्यांच्या घरी सोमवारी सकाळी झोपलेल्या अवस्थेत मृत आढळून आला. घटनास्थळाची परिस्थिती आणि आईच्या बोलण्यात विसंगती वाटल्यामुळे पोलिसांनी विक्रांतच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आपणच विक्रांतचा गळा दाबून खून केल्याचे राजश्री यांनी कबूल केले. पोलिसांनी खुनाचे कारण विचारल्यानंतर विक्रांत मला व माझ्या मुलीला सतत शिवीगाळ करून त्रास देत होता. 

सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने अल्पवयीन नातीशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला म्हणून काठीने मारून व गळा दाबून मारल्याचे राजश्री पवारने सांगितले. पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी राजश्री पवार हिच्यावर गुन्हा नोंदवून तिला अटक केली. चिपळूण न्यायालयात तिला हजर केले असता न्यायालयाने 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com