'धूम' स्टाइलचे 878 बळी 

'धूम' स्टाइलचे 878 बळी 

मुंबई : दुचाकीस्वारांनी मनमानी पद्धतीने गाडी चालवल्याने मागील सात वर्षांत मुंबई शहरात थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 878 जण बळी गेले आहेत. 'धूम' क्रेझने हे बळी घेतल्याचे वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षण आहे. 

मुंबई शहरात वेगाने दुचाकी चालविणाऱ्या 878 मोटारसायकलस्वारांनी मागील सात वर्षांत आपला जीव गमावला आहे, तर त्याहून अधिक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. मुंबई पोलिस आयुक्तच्या (नियोजन) वाहतूक पोलिस मुख्यालय, वरळी येथून मिळालेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. सात वर्षांत 878 मोटारसायकलचालकांनी आपला जीव गमावला आहे. 2011 पासून ते जुलै 2018 पर्यंतची ही माहिती पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली असून, यात सर्वाधिक मोटारसायकलचालकांचा मृत्यू 2015 मध्ये झाला आहे. या वर्षी तब्बल 178 सर्वाधिक मोटारसायकलस्वारांनी आपला जीव गमावला, तर त्या खालोखाल 2016 मध्ये 140 आणि 2017 मध्ये 110 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जानेवारी 2018 ते जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत मुंबईत 71 बाईकस्वारांचे अपघात झाले असून, त्यात अनेक जण कायमचे अपंग, तर अनेकांना काही किरकोळ इजा झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे याच कालावधीत मुंबईत 75 बाईकस्वारांचा विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती वाहतूक विभागाने माहितीच्या अधिकारात आनंद पारगावकर यांना दिली आहे. 

मुंबईत मागील सात वर्षांत दुचाकी वाहनचालकांचे तब्बल 832 गंभीर अपघाताच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. मोटारसायकलस्वारांचे सर्वांत अधिक मृत्यू आणि अपघातही 2015 मध्येच झाले असून, याच वर्षी 171 गंभीर अपघातांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. 2017 मध्ये 100, तर यंदा जानेवारीपासून ते जुलैपर्यंत 71 अपघातांची नोंद करण्यात आल्याची माहितीही पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

15 ते 30 वयोगटातील दुचाकीस्वारांचे प्रमाण 90 ते 95 टक्‍के इतके असून, "धूम' स्टाइलने वाहने चालवणे, बाईक रेसिंगची क्रेझ, मद्य पिऊन वाहन चालवणे आदींमुळे हे अपघात झाले आहेत, असे निरीक्षण आहे. 

मोटारसायकलस्वारांचे वर्षांतील मृत्यू 
2015 - 178 
2016 -140 
2017 - 110 
जुलै 2018पर्यंत- 71 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com