ओला, उबरच्या संपला संमिश्र प्रतिसाद (व्हिडीओ)

ओला, उबरच्या संपला संमिश्र प्रतिसाद (व्हिडीओ)

मुंबई : ओला, उबर वाहन चालकांनी काल रात्री पासून अघोषित संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासून अनेक भागातील ओला, उबर वाहन सेवा ठप्प होती. त्याला आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 

दिवाळी पूर्वी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ओला,उबर वाहनचालक, मालकांनी तब्बल 12 दिवसांचा संप पुकारला होता. दरम्यान मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (ता.19) रोजी आक्रोश मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ओला, उबर चालक, मालक सहकुटुंब मोर्च्यांत सहभागी होणार आहे.

रात्री मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अघोषित संपला वेगवेगळ्या भागात संमिश्र प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला ओला, उबर वाहने उभी केली जात आहे. तर रस्त्यावर धावणाऱ्या ओला, उबर वाहनांनाही सेवा थांबवण्यासाठी आवाहन मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com