उदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' ? 

उदयनराजेंबाबत शरद पवारांचा 'यॉर्कर' ? 

सातारा : उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध अशा बातम्या पसरत आहेत. तोपर्यंतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात उदयनराजेंच्या उमेदवारीला एकाही आमदारांचा विरोध नाही, असे विधान करुन राजकीय वर्तुळात 'यॉर्कर' टाकल्याची चर्चा आहे. आत्ताच काही स्पष्ट झाले तर उदयनराजेंना व्यूहरचना करण्यास संधी मिळेल अथवा अन्य पक्षांची ऑफर मिळेल, ते होऊ नये यासाठी हा विषय खेळवत ठेवण्याची पवार यांची खेळी असू शकते अशी ही चर्चा रंगू लागली आहे.

सोमवारी (ता.24) सातारा जिल्ह्यातील आमदरांनी बारामती येथे पवार यांच्याकडे उदयनराजे सोडून दुसरा कोणी ही उमेदवार द्या आम्ही निवडून आणू, अशी भूमिका मांडली तर पुण्यात उदयनराजेंनी पवार यांची भेट घेत आपली भूमिका मांडली. आज (मंगळवार) माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नांवर पवार यांनी उत्तर दिले. एका प्रश्‍नावर उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील एकाही आमदाराने विरोध केलेला नाही, असे स्पष्ट केले. पवार यांचे हे विधान अवघ्या काही सेकंदात राज्यभर पसरले.

उदयनराजेंचे समर्थकांच्या कॉलर ही टाईट झाल्या. सद्यस्थितीत राष्ट्रवादी विरोधक एकवटून उदयनराजेंच्या पाठीशी उभी राहतील अशी स्थिती निर्माण होईल. आत्ताच उदयनराजेंना विरोध आहे, हे राजकीय वर्तुळात स्पष्ट झाले तर राष्ट्रवादीसाठी धोकादायक ठरेल असा कयास बांधला जात आहे. भाजप अथवा अन्य पक्ष उदयनराजेंच्या वलयाचा फायदा करुन घेण्याची रणनिती आखतील. उदयनराजेंना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न होतील. यामुळे पवार यांचे आजचे विधान असू शकते अशी चर्चा राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

एकीकडे जिल्ह्यातील आमदार उघडपणे उदयनराजेंना विरोध करत आहेत, हे सर्वश्रोत आहे. दूसरीकडे मात्र शरद पवार यांनी एकाही आमदाराने उदयनराजेंना उमेदवारी नको असे कालच्या बैठकीत म्हटले नसल्याचे जाहीर केले. पवार यांचे हे विधान उदयनराजेंच्या गोटातील अस्वस्थता थोपविण्यासाठी होती की काय हे आगामी काळात स्पष्ट होईलच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com