शरद पवारांनी दाऊदबद्दल खुलासा करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

शरद पवारांनी दाऊदबद्दल खुलासा करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबई : 1993 च्या स्फोटानंतर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा भारताकडे सरेंडर व्हायला तयार होता. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. या बद्दल शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत दाऊदच्या प्रस्तावावरून शरद पवारांना लक्ष्य केले. दाऊदच्या प्रस्तावाबाबत यापूर्वीही चर्चा  झाली असून, त्यांच्या मागण्यांमुळे आपण तो प्रस्ताव फेटाळल्याचे शरद पवारांनी यापूर्वीही स्पष्ट केलेले आहे. आता याच प्रस्तावावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांमुळे दाऊद इब्राहिम शरण आला नाही का? शरद पवारांनी दाऊदबद्दल खुलासा करावा. ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांनी पवारांकडे प्रस्ताव दिला होता. पवारांनी मात्र प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. पवार मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आला होता. दाऊद सरेंडरबद्दल पवारांनी पंतप्रधानांना माहिती दिली होती का? असे अनेक प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांनी स्पष्ट करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com