प्रकाश आंबेडकरांच्या मनात शरद पवारांविषयी पराकोटीचा द्वेष

Prakash Ambedkar and Sharad Pawar
Prakash Ambedkar and Sharad Pawar

मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम याला शरण यायचे होते. फक्त त्याला थर्ड डिग्री देऊ नये अशी त्याची अट होती. परंतु, त्याला शरद पवारांनी येऊ दिले नाही. असा आरोप राम जेठमलानी यांनी केला होता. त्याला नाकारण्याचा निर्णय कोणाच्या पातळीवर झाला. याची चर्चा निवडणूकीच्या आधी लोकसभेतही होणे जरुरी असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.

या आरोपांचे खंडण करताना आव्हाडांनी त्यांची भूमिका मांडली. आव्हाड म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या स्पष्टवक्तेपणा बद्दल त्याचे आभार मानतो की हे आरोप माझे नसून रामजेठमलानींचे आहेत हे त्यांनी सांगितले. परंतु, जेठमलानींची अर्धवट माहिती घेऊन बोलल्यामुळे आता प्रकाश आंबेडकर अडचणीत आले आहेत. दाऊदची अट होती की मला माझ्या घरात राहू द्यायचे, माझ्यावर थर्ड डिर्गीचा वापर करायचा नाही. माझी चौकशी घरात होईल. कुठल्या दहशवाद्याला घरात ठेवण्याची परंपरा आपल्या संविधानात आहे याचे उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिले पाहिजे. बॉम्ब स्फोटात जे साडेचारशे लोक मारले गेले त्यांना काय उत्तर द्यायचे. प्रकाश आंबेडकर आरोप तथ्यहीन असून त्याला कसलाही आधार नाही. दाऊदला परत आणल्यास त्याला पोलिस कस्टडीमध्येच ठेवण्यात येईल अशी पोलिसांची मागणी होती. बॉम्ब, आरडीएक्स कुठून आले, यात कोणाचा हात आहे यासाठी थर्ड डिर्गीच वापरायची नाहीतर कशाला आणायचा दाऊदला परत.
दाऊद विषयी बोलणारे प्रकाश आंबेडकर पुलवामा, एअर स्ट्राईक, गोद्रा दंगलीवर कधीही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपी मसुद आझहरला भाजप सरकारने का सोडले असा प्रश्न प्रकाश आंबेडकर मोदींना कधी विचारणार नाहीत. त्यामुळे हे सगळे आरोप तथ्यहीन असून हस्यास्पद आहेत.  
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com