विशेष विद्यार्थ्यांमध्ये जुवेरिया, तुषार, लहू प्रथम

Sakal-Drawing-Competition-Result
Sakal-Drawing-Competition-Result

पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी अनुक्रमे अपंग, मूकबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून, तसेच अन्य राज्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या ऑनलाइन स्पर्धेत संजना प्रदीप शिरसाट अव्वल ठरली आहे.

गेल्या १६ डिसेंबरला महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच वेळी झालेल्या या स्पर्धांत बालचित्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे हे ३३ वे वर्ष होते. चित्रांच्या माध्यमातून मुलांना त्यांचे भावविश्‍व व्यक्त करण्याची संधी देणे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत चित्रकलेची जोपासना करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. तीन पिढ्यांना जोडणाऱ्या देशातल्या या सर्वांत विद्यार्थिप्रिय स्पर्धांमध्ये गेल्या ३३ वर्षांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे.  

झेड. एफ. इंडिया प्रा. लि. स्पर्धेचे टायटल प्रायोजक, इंडियन ऑईल कॉर्पोरेट पार्टनर, झी युवा एन्टरटेन्मेंट पार्टनर, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व सृजन कॉलेज ऑफ डिझाइन सहप्रायोजक होते.  

विभागपातळी व केंद्रपातळीचे निकाल यानंतर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होतील. तसेच, राज्यपातळीवरील सर्व विजेत्यांना पारितोषिकांबाबत लवकरच कळविण्यात येईल. विभाग व केंद्रपातळीवरील विजेत्यांना त्यांच्या शाळेमार्फत लवकरच बक्षिसे पोहोच केली जातील.

राज्य पातळीवरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विजेत्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे तपशीलही लवकरच जाहीर केले जातील.

सविस्तर निकाल -
अपंग विभाग 
अ गट 

प्रथम - जुवेरिया जमादार, इंडियन रेडक्रास सोसा. कर्णबधीर मुलांचे विद्या. एम.जी. रोड, कॅम्प, पुणे

द्वितीय - शिवम अशोक बरडे, श्री अमरनाथ विद्यालय, ता. कर्जत, जि. अमहमदनगर

तृतीय - रविना आर विलीप, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्यु. साऊथ गोवा

उत्तेजनार्थ - यश अरविंद शेलोकार, अस्थि व्यंग विद्यालय, वर्धमनेरी, जगन्नाथ शांतप्पा टककळकी, कै. का. स. म्हेत्रे अस्थिव्यंग निवासी शाळा, दुधनी, ता. अक्कलकोट, सोलापूर, प्राची अजित पाटोळे, डॉ. कुसुमाताई नरवणे कर्णबधीर शाळा, कांदिवली (प.) मुंबई, पल्लवी दुर्गाप्रसाद दासरी, समर्थ विद्यामंदिर, उंचगाव, पूर्व, ता. करवीर, जि. कोल्हापूर, अनंत बंडू चौरे, अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर, ता. जि. बीड, 

ब गट 
प्रथम - साक्षी प्रकाश सोनवणे, डॉ. कुसुमताई नरवणे कर्णबधीर शाळा, कांदीवली, प. मुंबई

द्वितीय - सुमन दास, संजय सेंटडर फॉर स्पेशल एज्युकेशन स्कूल, गोवा

तृतीय - हर्षा चामलाटे, अस्थिव्यंग विद्यालय, वर्धमनेरी

उत्तेजनार्थ - प्रज्ञा कांबळे, इंडियन रेडक्रॉस सोसा. कर्णबधिर मुलांचे विद्यालय, एम.जी. रोड, कॅम्प, पुणे, प्रथमेश पिराजी हळनर, निवाजी अपंग विद्या, अहमदपूर, टेंभुर्णी, ता. चाकूर, जि. लातूर, अरहान रशिद महाबरी समंत विद्यामंदिर, उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, पृथ्वीराज बापू ठोसर, जि. प. प्राथ. शाळा, थोरातवस्ती, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. 

क गट 
प्रथम - सविता खंडू उघडे, ग्रामीण अपंग केंद्र, टाकळी ढोकेशवर, जि. अहमदनगर

द्वितीय - नदीम नय्यूम पठाण, इंडियन रेडक्रॉस सोसा., कर्णबधीर मुलांचे विद्यालय, एम.जी. रोड, कॅम्प, पुणे, 

तृतीय - प्राची मोहन हिवराळे, श्रीमती गंगाबाई गंनसोकर विद्या, ता. चांदुर बाझार, जि. अमरावती

उत्तेजनार्थ - सरस्वती श्‍यामसुंदर गुप्ता, डॉ. कुसुमताई नवरणे कर्णबधीर शाळा, कांदीवली प. मुंबई, अंकुश दत्ता पवार, श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय, हदगांव, जि. नांदेड, निकिता यजकर मोहिते, समर्थ विद्यामंदिर, शांतीनगर, उचगाव पूर्व, ता. करवीर, जि. कोल्हापूर, अंजली विजयकुमार पवार, सेवागिरी इंग्लिश मि. स्कूल, वडूज, ता. खटाव, जि. सातारा. 

गट - ड 
प्रथम - क्‍लीफर्ड जॉन वैती, डॉ. कुसुमताई नरवणे कर्णबधीर शाळा, कांदिवली, प. मुंबई

द्वितीय - सौरभ दादा गदादे, श्री रविशंकर विद्यालय, कर्जत, जि. अहमदनगर

तृतीय - दिक्षा जानू वाघमारे, अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर, ता. जि. बीड

उत्तेजनार्थ - स्नेहा जितेंद्र पवार, डा. शि. एरम, मु. ब. विद्यालय, कराड, जि. सातारा, अविनाश झिबल पेंन्डोर, आनंद मु. ब. विद्यालय, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर, शुभांगी जयवंत कोळपे, जनता विद्यालय, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर, शुभम एस कांबळे, माध्यमिक विद्यालय जांबोरी, ता. खानापूर, जि. बेळगांव, प्रिती बी. गौणकर, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन स्कूल गोवा, देशमुख सत्यम परशुराम पुरंदर हायस्कूल, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. 

मुकबधिर विभाग 
अ गट 

प्रथम - तुषार सचिन बिऱ्हाडे, श्रवण विकास मंदिर कर्णबधिर शाळा, सावरखेडा, बु. ता. जि. जळगाव

द्वितीय - ऋतुजा सजिन चौधरी, श्री. साईश्रद्धा ग्रामिण मु. ब. विद्या, शिर्डी, जि. अहमदनगर

तृतीय - दिशा पांडुरंग जुमाळे, श्री नागनाथ. मु. ब. निवासी विद्या, बाभुळगांव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

उत्तेजनार्थ - रुद्र प्रदिल नलावडे, बधिर मुक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड, पुणे, साक्षी महेश चव्हाण, निवासी मु. ब. विद्यालय, गडहिंग्लज, कोल्हापूर, कुशल योगेश पाटील, श्री. नाकोडा कर्णबधिर विद्यास, सरवली, ता. भिवंडी, जि. ठाणे, यश गौर, कल्याण मु. ब. विद्यालय, नागपूर, दिनानाथ दिपक चव्हाण, माऊली कर्णबधिर निवासी विद्या, शिरोडा, सिंधुदुर्ग, साई सुर्याजीराव झाल्टे, मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय, येवला, जि. नाशिक 

गट ब 
प्रथम - प्रति अनिल धोत्रे, श्री. साईश्रद्धा ग्रामीण मु. ब. विद्यालय, शिर्डी, जि. अ. नगर

द्वितीय - पलक सचिन म्हस्के, कल्याण मु. ब. विद्यालय, नागपूर

तृतीय - दत्तात्रय बबन बुधावले, निवासी मु. ब. विद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर

उत्तेजनार्थ - मेघा राजेंद्र आहिरे, विकास मंदिर मु. ब. विद्यालय, दत्तमंदिर रोड, नाशिक, प्रणव मुकेश बोवर, श्री भैरव कर्णबधिर विद्यालय, भिवंडी, जि. ठाणे, अंजली दादासाहेब जगदाळे, बालकल्याण केंद्र बारामती, जि. पुणे. वैष्णवी विजय गोंधळी, कर्णबधिर विद्यालय, पेठवडगाव, हातकणंगले, जि. कोल्हापूर, भुषण ज्ञानेश्‍वर इंगळे, श्रवण विकास मंदिर कर्णबधिर मुलांची शाळा, सावरखेडा, ता. जि. जळगांव

क गट
प्रथम - अनिश संजय राय, प्रगती विद्यालय, दादर, मुंबई

द्वितीय - रोहन दत्तात्रय चौधरी, सी.आर. रंगनाथन कर्णबधीर विद्या, टिंगरेनगर, पुणे (येरवडा)

तृतीय - वैष्णवी गोविंद होंकरे, सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी, मुलींचे मु. ब. विद्यालय, लातुर

उत्तेजनार्थ - महेश परशुराम लवटे, जानकीबाई आपटे मु. ब. विद्या, अहमदनगर, स्वप्नील सतिश हातणकर, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, शिरोडा, सिंधुदुर्ग, ओम विकास सस्ते, मुकबधिर विद्या, गोळेगाव ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा, सेजल संतोष आहिरे, मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय, येवला, जि. नाशिक, बुद्धभुषण जिवन गवळे, श्रवण विकास मंदिर, कर्णबधिर मुलांची शाळा, सावरखेडा, जि. जळगांव, सरफराज अकबर तांबोळी, श्री. जगदंबा कमलाभवानी मु. ब. निवासी विद्या, ता. करमाळा, जि. सोलापूर. 

गट ड 
प्रथम - अक्षय सोमनाथ विधाते, दि न्यू हायस्कूल, व ज्यु. कॉलेज मुकबधीर इचलकरंजी, कोल्हापूर

द्वितीय - निषाद प्रभुलिंग बिदगे, बधिर मुक विद्यालय, बार्शी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

तृतीय - रोहिणी भाऊसाहेब मोरे, प. डॉ. ए. वि. पाटील विद्या, बाभळेश्‍वर, जि. नगर, 

उत्तेजनार्थ - रोहिणी केशवराव देशमुख, श्रीराम प्रताप मालपाणी, मुकबधिर विद्यालय, नांदेड, निखिल प्रल्हाद शिरसाठ, स्व. सी. आर. रंगनाथन, निवासी कर्णबधिर, विद्या, टिंगरेनगर, पुणे. सुयोग सुशिल गाडे, श्री नाकोडा कर्णबधीर विद्या, सरवली, ता. भिवंडी, जि. ठाणे, अक्षय नारायण डाखोरे, आनंद मु. ब. विद्या, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर, रंजना अंबादास निंबेकर, मायबोली निवासी कर्णबधिर, विद्या, येवला, जि. नाशिक, 

मतिमंद विभाग
अगट

प्रथम - लहु तुकाराम गावडे, डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालय, संगमनेर, जि. अहमदनगर

द्वितीय - स्वप्नील बाळासो कुंभार सन्मति मतिमंद विकास केंद्र, जि. कोल्हापूर, इचलकरंजी

तृतीय - शुभम रमेश गाडे, मतिमंद मुलांची निवासी शाळा, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे

उत्तेजनार्थ - अर्चना प्रसाद रामटेके, जिवनरक्षा मतिमंद मुला-मुलींचे निवासी विद्यालय, नागपूर, शुभंकर उदावंत, नवजीवन मतिमंद मुलांची शाळा, औंरगाबाद, अश्‍वनी शिवानंद चप्पळगाव, कै. मा. लक्ष्मीबाई सा. म्हेत्रे निवासी शाळा, दुधनी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, विशाल हणमंत भिसे, महात्मा शिक्षण संस्था संचालित मतिमंद मुलांची शाळा, ता. फलटण, जि. सातारा, निखिल राम पवार, प्रबोधिनी विद्यामंदिर शरणपूर रोड, नाशिक. 

गट ब 
प्रथम - सागर मदन नवले, प्रबोधिनी विद्यामंदिर, शरणपूर रोड नाशिक

द्वितीय - पायल हरिष बुरडे, मतिमंद मुलांची शाळा, कोराडी नागपूर

तृतीय - शुभम संजय मुरकुटे, कामायनी विद्यामंदिर, गोखलेनगर, पुणे, 

उत्तेजनार्थ - श्‍याम अंकुशराव कदम, कै. विठ्ठलराव मोरे, मतिमंद निवासी शाळा, पूर्णा, जि. परभणी, सर्वेश राजेंद्र साळोखे, विमला गोयंका इं. मि. स्कूल, शिवाजीपेठ, कोल्हापूर, गणेश रविंद्र पवार, आनंदबन मतिमंत मुलांची शाळा, सातारा, साई सुरेश गिते, श्रीसाई निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा, शिर्डी, जि. नगर 

क गट 
प्रथम - विष्णू राजेंद्र नायर, मतिमंद मुलांची शाळा व कार्यशाळा, टिळकरोड, वाडियापार्क, अहमदनगर

द्वितीय - युवराज सूर्यवंशी, कामायनी विद्या मंदिर, गोखलेनगर, पुणे, 

तृतीय - शर्वरी व्ही. चव्हाण, राधाबाई शिंदे इंग्लिश मि. स्कूल, सायबर चौक, कोल्हापूर 

उत्तेजनार्थ - शौनक संदीप वैद्य, अरुणोदय इंग्लिश स्कूल, हर्षराज कॉ. अमरावती, प्राची सोमनाथ कारंजकर, कन्या शाळा, सातारा, सौरभ रमेश कासार, प्रबोधिनी विद्यामंदिर, (मानसिक अपंगांसाठी शाळा) नाशिक, प्रणिता झिगाडे, नवजिवन मतिमंद मुलांची कार्याशाळा, औरंगाबाद. 

गट ड 
प्रथम - ज्ञानदा संतोष रहाटळ, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, चिंचोली गुरव

द्वितीय - ख्वाईश महेश पटेल, प्रबोधिनी विद्यामंदिर (मानसिक अपंगांसाठी शाळा) नाशिक

तृतीय -विजया आनंद माने, मुकबधिर विद्यालय, गोळेगांव ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा

उत्तेजनार्थ - अजय संजय खोपकर, श्री. वारणा चैतन्य मु. ब. मतिमंद मुलांची शाळा, वारणानगर, जि. कोल्हापूर, सायली मिलींद वर्धे, नॅशनल हायस्कूल, नवसारी, ता. जि. अमरावती.  

ऑनलाइन स्पर्धेतील गटवार विजेते-
अ गट

प्रथम -संजना प्रदीप शिरसाट (शांतिनिकेतन पब्लिक स्कूल)

द्वितीय- रोनाल्ड मनोहर धुमाळ (होरायझन स्कूल, रावेत)

तृतीय- आरुष अमोल टेभुळकर (सिटी इंटरनॅशनल स्कूल)

उत्तेजनार्थ- आर्यन शामसुंदर गलभिले (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ), काव्या सुधीर धुमाळ (नॉर्मल इं.स्कूल), निर्मयी निखिल निमकर (सहकार विद्या प्र. मंडळी, काळवा, ठाणे), रिया पारेख (रिन इंटर. स्कूल, कांदिवली), ऋत्विक राजेश चौकेकर (सेंट पीटर्स स्कूल), तन्वी मिलिंद जाधव (सादिपनी पब्लिक स्कूल, तरोडा बु. नांदेड)

ब गट 
प्रथम -अनमोल अभिजित पवार (बिशप्स को-एड स्कूल, कल्याणीनगर, पुणे), 

द्वितीय-तेज सतीश पेवेकर (इन्फॅंट जीजस प्राय. स्कूल, मालाड)

तृतीय- अंकुश सीताराम दराडे (श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड)

उत्तेजनार्थ- अंकिता सागर मंत्री (डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल), अनुज अमर निंबाळकर (रामकृष्ण ॲकॅडमी, केवळे), पार्थ सचिन कालेकर (विद्याशिल्प पब्लिक स्कूल), रुद्राणी भूषण साळुंके (ज्ञानदा इं. स्कूल), सार्थक विनायक कसबे (वूरीज हायस्कूल), श्रेया अमित भोंडवे (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे माळवाडी)

क गट 
प्रथम -निधी विजय नाईक (श्रीमती के. सी. गांधी इंग्लिश स्कूल)

द्वितीय- आयुष विनय निंबाळकर (महेश विद्यालय)

तृतीय- पलक भूषण साळुंके (ज्ञानदा इं.स्कूल)

उत्तेजनार्थ-अक्षय पारेख (रिन इंटर. स्कूल, कांदिवली), अथर्व प्रकाश देशमुख (भेल सेकं. स्कूल, परळी वैजनाथ), ज्योती रामदास पवार (डॉ. डी. एस. आहेर इं. मी. सेकं. स्कूल), महेश सुनील शेळके (विद्याशिल्प पब्लिक स्कूल), निया टी. भगत (भारतीय विद्या भवन, पुणे), प्रतीक्षा प्रदीप शिरसाट (सेंट झेवियर हायस्कूल), तन्वी राजेश गढी (सेंट इसाबेल हायस्कूल)

ड गट 
प्रथम -अनन्या आलोके (होम स्कूलिंग)

द्वितीय- आदित्य सुजित माळवदकर (फुलोरा स्कूल, लातूर)

तृतीय- स्नेहल प्रकाश देशमुख (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ)

उत्तेजनार्थ- अनिरुद्ध आलोके (होम स्कूलिंग), मृणाल संजय मोरे (सेंट जॉर्ज इं. मी. स्कूल, देहूरोड), साईनाथ मच्छिंद्र पाटकर (जनता विद्यामंदिर, घोडेगाव), प्रणव प्रशांत जगताप (न्यू इं. स्कूल, रमणबाग), प्रतीका सतीश बनकर (सेंट ॲन्स हायस्कूल), संस्कृती सुहास कांबळे (होली मिशन इं. मी. कूल)

राज्य पातळी परीक्षक समिती
मिलिंद फडके, मुकीम तांबोळी (पुणे), हिरामण पाटील (मुंबई), सुरेंद्र झिरपे (औरंगाबाद), विजय टिपुगडे (कोल्हापूर), दादाभाऊ पाटील (नाशिक), किशोर सोनटक्के (नागपूर), अरविंद कुडिया (नगर) आणि विशाल कुमावत (जळगाव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com