Section 377 : आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ!

gay
gay

मुंबई - समलिंगी संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सिनेसृष्टीने स्वागत केले आहे. समलिंगी संबंध हा गुन्हा ठरविण्यात आला नाही ही ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

करण जोहर, आलिया भट्ट, अनुपमा चोप्रा, ट्‌विंकल खन्ना, अनुष्का शर्मा, स्वरा भास्कर, सोनम कपूर, सोहा अली खान, गौतम रोडे, भूमी पेडणेकर, गौरव कपूर, वाणी कपूर, बोमन इराणी, राहुल बोस, कोयना मित्रा, आयूष शर्मा, गायिका नेहा कक्कर अशा अनेक सेलिब्रिटींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास कायम राहिल्याचे त्यांनी सांगितले.

समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्णय म्हणजे मानवतेचा सर्वांत मोठा विजय आहे. देशाला त्याचा श्‍वास परत मिळाला आहे.
- करण जोहर

स्त्री-पुरुष, समलिंगी या सगळ्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे. यात आतापर्यंत असलेल्या कृत्रिम भिंती झुगारल्या गेल्या. यातूनच आपली न्यायव्यवस्था अजूनही निष्पक्ष आहे हे कळून येते. आपला देश योग्य दिशेनेच वाटचाल करीत आहे.
- नेहा महाजन

न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत. एलजीबीटींच्या न्यायासाठी लढणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि धन्यवाद! माझ्या सगळ्या एलजीबीटी मित्र-मैत्रिणींना खूप प्रेम. सगळ्यांवर प्रेम करण्याची, सगळ्यांना प्रेम करू देण्याची आणि सगळ्यांना सामावून घेण्याची हीच वेळ आहे.
- रेणुका शहाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com