शिवशाही बसच्या तिकीट दरात कपात

Shivshahi Bus
Shivshahi Bus

पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. 

प्रवासी भाड्यात सुमारे २५० ते ५०० रुपयांनी कपात झाल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी सुनील भोकरे यांनी व्यक्त केली. 

मार्ग, कंसात जुना तिकीटदर, नवा दर पुढीलप्रमाणे - 
१) मुंबई- औरंगाबाद (१०८५) ८१०, रुपये २) मुंबई - बीड (१०८५) ८१०, ३) मुंबई- परळी (१३४०) १०००, ४) मुंबई - लातूर (१२७५) ९५०, ५) मुंबई- उस्मानाबाद (१११५) ८३५, ६) मुंबई- रत्नागिरी (९५५) ७१५, ७) मुंबई - कोल्हापूर (१०५०) ७८५, ८) मुंबई- अक्कलकोट (१२१०) ९०५, ९) मुंबई - खेड दिगर (१२१०) ९०५, १०) मुंबई - शिरपूर (१०५०) ७८५, ११) मुंबई- पंढरपूर (१०२०) ७६०, १२) बोरीवली - उदगीर (१४८०) ११०५, १३) बोरीवली - उमरगा (१३८५) १०३५, १४) बोरीवली - कोल्हापूर (१०२०) ७६०, १५) पुणे- नागपूर (१९९०) १४८५, १६) पुणे- धुळे (९१०) ६८०, १७) पुणे- नंदुरबार (११३०) ८४५, १८) पुणे- शहादा (११६५) ८७०, १९) पुणे- जळगाव (१०५०) ७८५, २०) पुणे- चोपडा (११३०) ८४५, २१) पुणे- मलकापूर (१२४५) ९३०, २२) पुणे- शेगाव (१२६०) ९४०, २३) पुणे- अमरावती (१५९५) ११९०, २४) शिवाजीनगर (पुणे) - यवतमाळ (१६१०) १२००, २५) नाशिक - सोलापूर (१०८५) ८१०, २६) नाशिक- नागपूर (१८८०)१४०५, २७) नाशिक- कोल्हापूर (११९५) ८९०, २८) नाशिक - इंदोर (१११५) ८३५, २९) नाशिक- अहमदाबाद (१४००) १०४५, ३०) नागपूर- औरंगाबाद (१३७०) १०२५, ३१) नागपूर- नांदेड (१००५) ७५०, ३२) नागपूर - हैदराबाद (१३८५) १०३५, ३३) नागपूर - सोलापूर (१६९०) १२६०, ३४) नांदेड - वल्लभनगर (पिंपरी चिंचवड) (१३०५) ९७५, ३५) नांदेड - वल्लभनगर (१२६०) ९४०, ३६) नांदेड- कोल्हापूर (१३५५) १०१०, ३७) जालना - कोल्हापूर (१३४०) १०००, ३८) निलंगा- वल्लभनगर (१०३५) ७७५, ३९) परभणी- वल्लभनगर (१०८५) ८१०, ४०) रत्नागिरी - निगडी (९४०) ७००, ४१) पिंपरी चिंचवड- अकोला (१३४०) १०००, ४२) अमरावती - पंढरपूर (१४८०) ११०५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com