सव्वादोन लाख रुग्णांवर उपचार

Government-Cancer-Hospital
Government-Cancer-Hospital

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग रुग्णालयाने सातव्या वर्षात पदार्पण केले असून, शुक्रवारी (ता. २१) सहावा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. दर्जेदार उपचारासह केलेल्या कामगिरीमुळे या रुग्णालयाने राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळवला. शंभर खाटांच्या रुग्णालयाची वाटचाल तीनशे खाटांच्या राज्य कर्करोग संस्थेकडे होत आहे. तसतशी रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. 

मराठवाड्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वाशीम, बुलडाणा, नगर, नाशिक या जिल्ह्यासह अन्य राज्यातूनही रुग्ण शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल होत आहेत. शासकीय कर्करोग रुग्णालय २१ सप्टेंबर २०१२ ला रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या वर्षभरात भाभाट्रॉन-२ युनिट कार्यरत झाल्याने वेटिंग आठवड्यावर आले आहे, तर मनुष्यबळाचा प्रश्‍नही मार्गी लागला. तसेच किरणोपचारमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू झाला. आगामी दोन वर्षांत राज्य कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणामुळे १६५ खाटांची वाढ व अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या उपलब्धतेचे काम प्रगतिपथावर असल्याने संशोधनालाही वाव मिळणार आहे.

अर्ध्या तपाची कामगिरी 
बाह्यरुग्ण विभाग     :     २,१२,१६६
आंतररुग्ण विभाग     :     २४,४४१
लिनिअर एस्केलेटर     :    ४,०८७
कोबाल्ट युनिट     :     १,४२२
ब्रेकी थेरपी     :    १,५३२
डे केअर केमोथेरपी     :    ३८,४८४
मोठ्या शस्त्रक्रिया     :    ४,२३२
छोट्या शस्त्रक्रिया     :    ३,०६५

तपासण्या 
मायक्रोबॉयलॉजी     :    १९,०१५
पॅथॉलॉजी    :    १,४४,७३८
बायोकेमेस्ट्री    :    ६,०६,१२४

गेल्या वर्षभरात पॅलेटिव्हकेअर, स्वतंत्र बालरोग विभाग, कॅन्सर रजिस्टरी, पाच कर्करोग शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम रुग्णालय घेत आहे. पुढच्या वर्षभरात रुग्णालयाचा व्याप अजून वाढणार आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील यांच्यासह आणि रुग्णालयाच्या सर्व विभागप्रमुख, डॉक्‍टर, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हे शक्‍य झाले आहे. 
- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com