हदगाव नगरपरिषदेचा सेवक एसीबीच्या जाळ्यात 

bribe
bribe

नांदेड : जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्ती करून देण्यासाठी एका सेवकाला लाचलुचपत प्रतिबंदक विभागाने पाचशे रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता. 25) सकाळी साडेअकराच्या सुमारास हदगाव नगरपरिषद कार्यालयात करण्यात आली.

येथील नगरपरिषदेमध्ये विठ्ठल जिजाजी काळे हा सफाई कामगार परंतु सध्या मृत्यू व जन्म प्रमाणपत्र आवक जावक विभागात कार्यरत आहे. या कार्यालयात आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्रावर नाव चुकीचे छापून आले आहे. ते नाव दुरूस्त करण्यासाठी तक्रारकर्ते नगरपरिषद कार्यालयात गेले. परंतु या कमासाठी तुम्हाला पाचशे रुपये द्यावे लागतील असे शिपाई विठ्ठल काळे यांनी सांगितले. परंतु पैसे देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात सोमवारी (ता. 24) तक्रार दिली. यावरून या विभागाने मागणी पडताळणी केली. यात पैसे मागल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी सकाळी नगरपरिषद कार्यालयात सापळा लावला. यावेळी विठ्ठल काळे हा लाच स्विकारताना तो सापळ्यात अडकला. त्याच्याविरूध्द हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. एल. पेडगावकर, कर्मचारी बाबु गाजुलवार, एकनाथ गंगातिर्थ, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com