त्या सातही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणार - डाॅ. निलम गोऱ्हे

त्या सातही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणार - डाॅ. निलम गोऱ्हे

माजलगांव (बीड)-  कमलेश जाब्रस: येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीदरम्यान मिरा एखंडे व तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या सातही मुलींच्या शिक्षणाची बाहेरगावी व्यवस्था करणार असुन या कुटुंबास आर्थिक मदत मिळण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन एखंडे कुटुंबीयास न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन शिवसेना उपनेत्या डाॅ. निलम गोऱ्हे यांनी आज (ता.14) दिले.

येथील पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमीत्त शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे माजलगांव येथे आल्या होत्या. येथील शासकीय विश्रामगृहावर मयत मिरा एखंडे यांचे पती रामेश्वर व त्यांच्या सात मुली यांची आज भेट घेतली.

28 डिसेंबरला मिरा एखंडे या महिलेचा प्रसुतीदरम्यान बाळासह मृत्यु झाला होता. एखंडे कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच या कुटुंबास आर्थिक मदत तसेच या प्रकरणाची चैकशी तातडीने करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असुन त्या सातही मुलींच्या शिक्षणाची बाहेरगावी व्यवस्था करणार असल्याने सांगीतले. यावेळी संजय महाव्दार, वंदना चव्हाण, सुशिल पिंगळे, तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, रामराज सोळंके, शहरप्रमुख पापा सोळंके, दत्ता रांजवण, नितीन मुंदडा, सुनिल खंडागळे, सुरज गवरकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com