बी. कॉमच्या परीक्षेत प्रश्नच चुकीचे!

बी. कॉमच्या परीक्षेत प्रश्नच चुकीचे!

नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चारपैकी तीन प्रश्न चुकीचे टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. विद्यापीठात सुरु असलेल्या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

डॉ. उद्धव भोसले यांच्या रुपाने विद्यापीठाला कडक शिस्तीचे नवीन कुलगुरु लाभले असे त्यांच्या शिस्तप्रीय वागण्यातून व विद्यार्थीप्रिय निर्णायावरुन वाटत असताना शुक्रवारी ‘बी. कॉम’च्या तृतीय वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरच्या प्रश्न पत्रिकेतील चार पैकी तीन प्रश्न हे मागील वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरमधील बदललेल्या सिलॅबसमधील असल्याने अंधळा दळतं आणि कुत्रे पिट'खाते अशी गत विद्यापीठ प्रशासनाची झाल्याचे दिसून आली. 

विशेष म्हणजे पेपरमध्ये चुकीचे प्रश्न आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनापूर्वी बहुतेक महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तेव्हाच लक्षात आले. मात्र एकाही प्राध्यापकांनी या बद्दल तोंडातून शब्द न काढता विद्यार्थ्यांना दिड ते दोन तास चुकीच्या प्रश्नाची उत्तरे लिहू दिली. पेपरची वेळ संपत अल्यानंतर विद्यापीठ प्रशानाच्या चुक लक्षात येताच त्यांनी साडे आकराच्या सुमारास विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नवीन पेपर देण्यात आला व पहिली प्रश्नपत्रिका चुकीची होती, असे सागण्यात आले. तेव्हा गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशानाबद्दल संताप व्यक्त केला व अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवीन पेपर लिहिण्यात नकार दिला. तर काही महाविद्यालयातील प्रशासनाने विद्यार्थ्यांना धमकावून पुन्हा पेपर लिहण्यास भाग पाडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्गत नांदेड, परभणी आणि लातूर विभाग येतो. त्यामुळे नांदेड शहरातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेला बी. कॉम. तृतीय वर्षाची सुधारीत प्रश्नपत्रिका पोचण्यास दीड ते पावणेदोन तासांचा वेळ लागला. तेव्हा इतर महाविद्यालयात पेपर वेळेत पोहचला असेल का, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com