अनिसं कडून स्मशानभूमीत वाढदिवस साजरा!

Birthday celebrations by in crematorium in solapur
Birthday celebrations by in crematorium in solapur

जिंतूर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जिंतुरच्या वतीने बुधवारी (ता. 19) रात्री दहा ते बाराच्या सुमारास येथील सार्वजनिक स्मशानभूमीत ऋषिकेश शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

स्मशानभूमीत भूत, प्रेतात्म्यांचा वावर असतो ते मनुष्याला हानी पोचवितात असे बरेच गैरसमज स्मशानभूमीच्याबाबतीत असल्याने समाजात भिती निर्माण झालेली आहे. त्याचा भोंदू बाबा गैरफायदा घेऊन लोकांचे शोषण करतात. तेव्हा समाजातील भिती व गैरसमज दूर व्हावे व भोंदूगिरीला आळा बसावा या हेतूने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पंढरीनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिससचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विठ्ठल घुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील जाधव, मुंजाजी कांबळे, काळे साहेब चंद्रकांत गंगार्डे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना असे कार्यक्रम घेणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले. पंढरीनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रा. बाळू बुधवंत, शहेजाद खान यांही मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्वांनी ऋषिकेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त सर्व उपस्थितांसाठी शाकाहारी व मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

भूषण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अहेमद सिद्दीकी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अनिसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक थिटे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर लिखे, निवृत मुख्याध्यापक एम. के. कादरी, पत्रकार रियाज चाउस, शेख अलीम, श्री सोळंके, स्वच्छता निरीक्षक सालेह चाउस, लाला जैस्वाल आदींसह नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com