विद्यार्थ्यांकडून सक्‍तीने शुल्कवसुली 

विद्यार्थ्यांकडून सक्‍तीने शुल्कवसुली 

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये सक्‍तीने परीक्षा शुल्क वसूल करत आहेत. 'एमकेसीएल'नेही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कोणतेही बदल केलेले नाहीत. महाविद्यालयांची दांडगाई आणि एमकेसीएलच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

राज्यात भीषण दुष्काळ पडल्याने 180 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत. त्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले आहे. शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिपत्रक काढले. संबंधित सर्व महाविद्यालयांना परीक्षा शुल्क घेऊ नये, असेही कळविण्यात आले आहे. मात्र, तरीही सक्‍तीने शुल्क वसुली होत आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि विधी शाखेच्या परीक्षा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहेत. त्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज एमकेसीएलतर्फे भरले जात आहेत. शासन निर्णय निघाल्यानंतरही एमकेसीएलने सॉफ्टवेअरमध्ये कोणतेच बदल केले नाहीत. परीक्षा शुल्क भरले असेल तरच, अर्ज स्विकारले जात आहेत. त्यामुळे महाविद्यालयेदेखील विद्यार्थ्यांकडून सक्‍तीने शुल्क वसूल करत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली तरी, अर्ध्याहुन अधिक विद्यार्थ्यांनी पैश्‍यांअभावी अर्ज भरलेले नाहीत. यात विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.

परीक्षा शुल्कासाठी महाविद्यालये सक्‍ती करीत आहेत. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज एमकेसीएल भरत असून शुल्क भरल्याशिवाय अर्जच सबमिट होत नाही. त्यामुळे विधी शाखेच्या 60 टक्‍के मुलांनी अद्याप अर्ज भरले नाहीत. 

- नवनाथ देवकते, विद्यार्थी.

नियमित विद्यार्थ्यांचेच परीक्षा शुल्काशिवाय अर्जएमकेसीएल घेत नाही. तर, "बॅक'च्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍नच नाही. एमकेसीएलकडून सुधारणा अपेक्षीत आहे. यात आम्हाला काहीच करता येत नाही. तक्रार मात्र केली आहे. 

- डॉ. सी. एम. राव, प्राचार्य, एम. पी. लॉ कॉलेज.

विद्यार्थी, महाविद्यालयांच्या तक्रारी आल्या आहेत. प्र-कुलगुरुंना कळविले आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. 
- डॉ. जयश्री सुर्यवंशी, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com