लातुरात कचऱयाची धुराडी

लातुरात कचऱयाची धुराडी

लातूर : येथील महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेटतो आहे. हेच लोन आता शहरात आले आहे. मंगळवारी (ता.13) जिल्हा बँकेच्या पाठीमागील मिनी कचरा डेपोला आग लागली. दोन तास धुराचे लोळ हवेत राहिले. अग्निशमन दलाच्या गाडीने येवून ही आग आटोक्यात आणली. या प्रकारामुळे नागरीकांचे आरोग्य मात्र धोक्यात येत आहे.

कचरा पेटतोय की पेटवला जातो याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. 
मोठ्या शहरांचा कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्याला लातूर शहरही अपवाद राहिलेले नाही. शहरात दररोज 150 टन कचरा गोळा केला जातो. वरवंटी येथील डंपिंग ग्राऊंडवर तो नेवून टाकला जात आहे. तेथील कचरा सातत्यान पेटतो. कधी कधी तो पेटविलाही जातो. त्या परिसरातील गावातील ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे सुरु आहे.

शहरात दोनशेच्या वर ठिकाणी कचरा साठविला जातो. त्यात जिल्हा बँक व गोरक्षणाच्या पाठीमागच्या बाजूस मिनी कचरा डेपोच तयार केला आहे. शहरातील अनेक भागातून गोळा केला जाणारा कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. त्यानंतर तेथून भरून तो डपिंग ग्राऊंडवर नेवून टाकला जातो. काही दिवसापूर्वीच दिवाळी संपली आहे. या सणाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला. तो या मिनी कचरा डेपोवर आणून टाकण्यात आला. पण तेथून तो लवकर उचलण्यात आला नाही. याचा परिणाम तो साचत गेला. या भागातील नागरीकाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात मंगळवारी दुपारी तर हा कचरा पेटला. दोन तास धुराचे लोळ हवेत राहिले. महापालिकेच्या अग्निशमन दल  व एका खासगी टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. धूर जास्त झाल्याने जवळचेही दिसत नव्हते. कचरा पेटत असल्याने नागरीकांचे आरोग्य मात्र धोक्यात आहे. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

कचरा पेटल्यानंतर त्यातून कार्बनडायआॅक्साईड बाहेर पडतो. यामुळे श्वसनाचे विकार, श्वास घेण्यास त्रास होणे, दम कोंडणे, सर्दीचा विकार, अॅलर्जीचा विकार असे त्रास व आजार होवू शकतात. कचऱयाचा धूर हा नागरीकांच्या आरोग्यासाठी घातकच आहे.

- डॉ. पवन लड्डा, लातूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com