मराठवाड्यातील 21 जणांचा कृषी विभागाचे पुरस्कार  

कृषी पुरस्कार जाहीर
कृषी पुरस्कार जाहीर

औरंगाबाद - कृषी, फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, संस्थांना शनिवारी (ता. दोन) राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागातर्फे देण्यात येणारे वर्ष 2015 व 2016 मधील विविध पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये मराठवाड्यातील 21 जणांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे होणार असून, याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. 

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-2015 
मराठवाड्यातील तीन शेतकरी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये उद्धव खेडेकर (शिवणी, ता. जि. जालना), रवींद्र गोल्डे (पिंपरखेड, ता. अंबड, जि. जालना), त्र्यंबक फंड (जळकोटवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) आदींचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 2015 चे विजय चौधरी (खुलताबाद, जि. औरंगाबाद) मानकरी ठरले आहेत. 
 
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण गट) 
जयकिसन शिंदे (रा. वरुडी, ता. बदनापूर, जि. जालना), भरत आहेर (टोणगाव, ता. जि. औरंगाबाद), बालाजी तट (आपेगाव, ता. अंबेजोगाई, जि. बीड), बाबासाहेब पाटील (हेर, ता. उदगीर, जि. लातूर), सदाशिव थोरात (सारोळा खुर्द, ता. पाथ्री, जि. परभणी) आदींना वर्ष 2015 चा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 2016 चा पुरस्कार संतोष राठोड (वसंतनगर तांडा, ता. परळी, जि. बीड), दीपक चव्हाण (सुलतानपूर, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद), पुंजाराम भुतेकर (हिवर्डी, ता. जि. जालना), राजकुमार बिरादार (गौडगाव वि., ता. देवणी, जि. लातूर), अच्युत बोचरे (पाडळी आ., ता. जि. उस्मानाबाद) यांना जाहीर झाला आहे. 
 
उद्यानपंडित पुरस्कार 
विकास थिटे (बावची, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), रमेश सिरसट (आरणगाव, ता. केज, जि. बीड) तर 2016 चा पुरस्कार विजय ठाकरे (रा. निराळा, ता. किनवट, जि. नांदेड) यांना जाहीर झाला आहे. 
 
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-2016 
पांडुरंग इनामे, (रांजणगाव खुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), अनिलल चेळकर (किल्लारी, ता. औसा, जि. लातूर). 
 
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार-2016 
सुनंदा क्षीरसागर (पांगरा-चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) 
 
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-2016 
सूर्यकांत नेटके (नगर), संतोष देशमुख (हनुमानगर, औरंगाबाद)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com