उस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा पहिला बळी

dead_body
dead_body

जेवळी : स्वाईन फ्लुमुळे जेवळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 25) सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुचा हा पहिलाच बळी आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

जेवळी येथील एका 60 वर्षीय महिला या गेल्या 15 दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त होत्या. सुरवातीला येथील खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले, परंतु हा आजार वाढल्याने व श्वसनाचा त्रास होत असल्याने 10 सप्टेंबरला त्यांना उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॅाक्टरांनी स्वाईन फ्लुची लक्षणे असल्याने उपचारासाठी अन्यत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या रुग्णास नातेवाईकांनी 13 सप्टेंबरला पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदान झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर 15 सप्टेंबरला जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने जेवळी येथे भेट देऊन याबाबत आढावा घेतला होता. 

दरम्यान, उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेपासून या महिलेची प्रकृती नाजूक बनली. सकाळी आठ वाजता या महिलेचे निधन झाले. जेवळी व परिसरात साथरोगाने अनेक रुग्ण बाधित आहेत. परंतु येथील स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com