औरंगाबाद शहर पोलिस दलात बदल्या 

police
police

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली. तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 16 सहायक निरीक्षक आणि 52 उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियमावलीनुसार या बदल्या झाल्या आहेत. पोलिस आयुक्तालयातील बदल्यांची यादी मंगळवारी (ता. 19) रात्री जाहीर करण्यात आली. एकूण 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक आणि 16 सहायक पोलिस निरीक्षक आणि 52 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यादी जाहीर होताच त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवारी या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे. 

सहायक आयुक्तांच्या बदल्या अशा 
छावणी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांची वाहतूक विभागात, शहर विभागाचे गोवर्धन कोळेकर यांची विशेष शाखेत, वाहतूक 
शाखेचे हनुमंतराव भापकर यांची बदली शहर विभागात झाली. त्यांच्याकडे छावणी विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला. 
 
निरीक्षकांच्या अशा बदल्या 
अनिल गायकवाड यांची क्रांती चौकहून एमआयडीसी वाळूजला, अनिल गाडे यांची वेदांतनगरहून सातारा, मनोज पगारे यांची वाहतूक शाखा वाळूज येथून छावणी, उत्तम मुळक यांची नियंत्रण कक्षातून क्रांती चौक ठाणे, मुकुंद देशमुख यांची वाहतूक शाखा छावणी येथून हर्सूल, अशोक गिरी यांची नियंत्रण कक्षातून मुकुंदवाडी ठाणे, हमुमंत गिरमे यांची वाहतूक शाखा सिडको येथून जवाहरनगर, रामेश्वर रोडगे यांची सुरक्षा विभागातून वेदांतनगर ठाणे, प्रेमसागर चंद्रमोरे यांची सातारा ठाणे येथून नियंत्रण कक्षात, सतीश टाक यांची वाळूज येथून बॉंबशोधक व नाशक पथक, निर्मला परदेशी यांची सिडको ठाणे येथून वाहतूक शाखा सिडको, नाथा जाधव यांची मुकुंदवाडी ठाणे येथून वाहतूक शाखा वाळूज, शरद इंगळे यांची जवाहरनगर पोलिस ठाण्यातून वाहतूक शाखा छावणी येथे बदली करण्यात आली. 
 
सहायक निरीक्षक 
सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड यांची बेगमपुरा पोलिस ठाण्यातून सुरक्षा विभाग, साहेबराव कांबळे यांची जवाहरनगरहून नियंत्रण कक्ष, राहुल जाधव यांची एम सिडकोतून नियंत्रण कक्ष, विजय घेरडे यांची वाळूजहून उस्मानपुरा, 
साईनाथ गीते यांची जिन्सीहून वेदांतनगर, आशा भांगे यांची सिटी चौकहून एमआयडीसी वाळूज, वनिता चौधरी यांची वेदांतनगरहून जिन्सी, मनोज बहुरे यांची सातारा ठाणे येथून वाहतूक शाखा, वामन बेले यांची उस्मापुराहून नियंत्रण कक्ष, सिकंदरखान समशेर खान यांची सिटी चौकहून पैरवी अधिकारी, सतीश जाधव क्रांती चौकहून वाहतूक शाखा, शांतिलाल राठोड यांची शहर वाहतूक 
शाखेतून क्रांती चौक, शेख अकमल यांची शहर वाहतूक शाखेतून एमआयडीसी सिडको, शेषराव खटाणे यांची छावणी वाहतूक शाखेतून सिटी चौक, राहुल सूर्यतळ यांची गुन्हे शाखेतून क्रांती चौक, घनश्‍याम सोनवणे हे पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी होते. त्यांची पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. यासह 52 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com