डेंग्यूने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

One school going girls death because of dengue in purna parbhani
One school going girls death because of dengue in purna parbhani

पूर्णा (जि. परभणी) : डेंग्यूची लागण होऊन शाळकरी विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नगरपालिका व आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबद्दल शहरात संताप व्यक्त केल्या जात आहे.

मस्तनापुरा भागात राहणाऱ्या चौदा वर्षीय फराहबेगम अमिनखान पठाण या शालेय विद्यार्थीनीचा डेंग्यूच्या तापाने रविवारी (ता. 16) मृत्यू झाला आहे. शहरातील डॉ. जाकीर हुसेन शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी फराह अमीन खान पठाण या विद्यार्थीनीला गेल्या चार-पाच दिवसांपासून ताप आल्याने तिला तिच्या पाल्यांनी शहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखविले. परंतु ताप कमी झाला नाही. त्यामुळे तिला नांदेड येथील अपेक्षा रुग्णालयात शनिवारी (ता. 15) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्या करण्यात आल्या असता डॉक्टरानी डेंग्यू झाल्याचे सांगितले. तिचा उपचार सुरू केला. परंतु उपचार सुरु असताना रविवारी (ता. 16) तिचा डेंग्यूने मृत्यू झाला. तसे मृत्यूच्या प्रमाणपत्रात नमुद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com