बारा बलुतेदारांचे धरणे आंदोलन

Agitation
Agitation

बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले.

आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे दुकान अशा विविध पारंपरिक दुकानांची या ठिकाणी वर्दळ दिसली. ओबीसी महामंडळाची कर्जमाफी करावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्यावी, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार द्यावा, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्यावा, संत गोरोबा काका माती कला बोर्डाला दहा कोटी रुपयांचा निधी द्यावा, भोई समाजाला घरकुल द्यावे, कारागिरांना दोन हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत, यांसह विविध 26 मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com