जालन्यात पेट्रोलच्या दराचा भडका

petrol
petrol

जालना : परभणी नंतर आता जालना जिल्ह्यात पेट्रोल दराने नव्वदी पार केली आहे. सोमवारी (ता. 18) शहरासह ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.44 एवढा होता. तर डिझेल दरातही 18 पैशाने वाढ झाल्याने  प्रति लिटरसाठी वाहनधारकांना  78.10 पैस मोजावे लागले.  

गेल्या महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या विरोधात 10 सप्टेंबरला काँग्रेसने देशव्यापी बंद पाळला. या बंदमध्ये विविध संघटनानी सहभागी होऊन इंधन दरवाढीचा निषेध करत इंधनाची किंमत कमी करण्याची मागणी केली. मात्र, याचा काहीही परिणात सरकारवर झाला नसल्याचे दिसत आहे. पेट्रोल व डिझेल दरात पुन्हा वाढ झाली.

दोन दिवसांपूर्वी 77.92 रूपये प्रति लिटर असलेल्या डिझेलचा दर सोमवारी (ता. 18) 78.10 झाला. तर पेट्रोलच्या दर 89.87 वरून 90.44  रूपयापर्यंत गेले आहे.   सोमवारी शहरातील पेट्रोल पंपावर  वेगवेगळे दर पहायला मिळाले. अंबड चौफुली नजीकच्या भारत पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 90.44 होता. तर गांधी चमन व जालना औरंगाबाद मार्गावरील पंपावर 91.59 पैसे एवढा दर होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com