बटाटा, लसणाच्या भावात वाढ 

potato
potato

औरंगाबाद - मागील महिन्यात बाजार समितीत बटाटा व लसूण होलसेल मार्केटमध्ये 4 ते 7 रुपये किलो दराने विकला गेला. दुसरीकडे किरकोळ बाजारात विक्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याने चढ्या भावाने विकला गेला होता. आठ दिवसांपासून बटाटा व लसणाचे भाव वधारल्याचे व्यापारी इब्राहिम खान यांनी सांगितले. 

जाधववाडी बाजार समितीत जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून बटाटा व लसणाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे ठोक बाजारात बटाटा व लसणाला 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. बाजार समितीत आग्रा, उत्तर प्रदेशातून बटाट्याची तर मध्य प्रदेशमधून लसणाची आवक होत असते. आठ दिवसांपासून बटाट्यासह लसणाची नवीन मालाची आवक होण्यास सुरवात झाली. समितीत रोज बटाट्याचा 10 गाडी माल म्हणजे 700 ते 1200 क्विंटल आवक होऊन 800 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल भाव; तर लसणाची 150 ते 200 क्विंटल आवक होत असल्याने होलसेल मार्केटमध्ये 1,000 ते 3,500 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे खान यांनी सांगितले. दुसरीकडे किरकोळ व्यापारी कमी भावात माल खरेदी करून बाजारात चढ्या भावाने विक्री करीत आहेत. 
 

बाजार समितीत मागील आठ ते दहा दिवसांपासून नवीन बटाटा व लसणाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच नवीन लसूण इंदोरवरून येत आहे. त्यामुळे भावात वाढ झाली. ग्राहकीही चांगली असल्याने विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. 
- इब्राहिम खान, व्यापारी 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com