१७ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प

Solar-Project
Solar-Project

परभणी - महापालिकेच्या १७ कोटी रुपयांच्या सौर उर्जा प्रकल्पाला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेची वर्षाला तीन ते चार कोटींची बचत होणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. 

महापालिकेला पाणीपुरवठा, पथदिव्यांसाठी दरवर्षाला कोट्यवधींची देयके द्यावी लागतात. अनेक वेळा देयकाच्या रकमेची तरतूद न झाल्यामुळे विद्युत मंडळाने महापालिकेच्या वीज जोडण्यादेखील तोडल्या आहेत. त्याचा परिणाम शहराचा पाणीपुरवठ्यावरदेखील झालेला आहे. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, म्हणून जिल्हा प्रशासनालादेखील मध्यस्ती करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी महापालिकेचे स्वतःचे शाश्वत स्त्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

तीन मेगावॅट विद्युत निर्मिती
या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा विभागासाठी हा सौर प्रकल्प उभारल्या जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून प्रकल्प सुरू झाल्यास त्यातून तीन मेगावॅट विद्युत निर्मिती होईल. ती पाणीपुरवठ्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे महापालिकेच्या तीन ते चार कोटींच्या विद्युत देयकांची बचत होणार असून या रकमेचा अन्यत्र विकास कामासाठी उपयोग होऊ शकतो. तीन ते चार महिन्यांत हा प्रकल्प सुरू होईल, असेही श्री. पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com