चोरट्यांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे कपडे केले लंपास

चोरट्यांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे कपडे केले लंपास

नांदेड : नांदेड येथे गृहरक्षक दलाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चोरट्यांनी चांगलाच झटका दिला आहे. शारीरिक चाचणीतील धावण्याच्या स्पर्धेसाठी आलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवारांचे मोबाईल, पाकिट आणि कपडेही चोरट्यांनी मंगळवारी (ता. १६) सकाळी लंपास केले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून या बाबत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथे गेल्या दोन दिवसांपासून गृहरक्षक दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांची धावण्याची स्पर्धा ही मामा चौक भागात घेण्यात येते. त्यासाठी नांदेडहून उमेदवारांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास निवड झालेल्या उमेदवारांनी आपले कपडे व अन्य साहित्य बाजूला काढून ठेवले. या गोंधळात पाकिटमारांनी आपला हात साफ केला.

चोरट्यांनी मुंजाजी कल्याणकर, सोमनाथ गवारे, मुंजाजी कदम, सचिन टोकलवार आणि गणेश कदम या पाच जणांचे पाकिट चोरीला गेले आहे. रोख रक्कम, एटीएम, वाहन परवाना, आधार कार्ड, मोबाईल, मतदान कार्ड आणि कपडे असा वीस हजार ७०० रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com