आंध्रात नेले पळवून अन् केला वारंवार बलात्कार; दीड वर्षांनी सुटका

A year after the fake marriage promise the victim girl was released
A year after the fake marriage promise the victim girl was released

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीला पळवून नेऊन आंध्रप्रदेशमध्ये डांबून ठेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या चार जणांविरूध्द भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दीड वर्षानंतर पिडीतेने आपली सुटका करून घेऊन भोकर गाठले.

भोकर तालुक्यातील किनी येथे राहणाऱ्या एका युवतीसोबत साईप्रसाद राजू अंबेकर याने प्रेमसंबंध वाढविले. यातच त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून पिडीत युवतीला 16 ऑगस्ट 2017 ला रात्री बारा वाजता पळवून नेले. यावेळी पीडीत युवतीने आपल्या घरून एक लाख तीस हजार रुपये रोख व 15 तोळे सोने घेतले होते. तिला घेऊन साईप्रसाद याने थेट हैदराबाद गाठले. त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अभिलाष चंदर रेड्डी यल्लावाड, अभिषेक चंदर रेड्डी आणि चंदर रेड्डी यल्लावाड यांनी मदत केली.

पीडीत युवतीला दीड वर्ष आंध्रप्रदेशमध्ये रेडीपालम चितुर येथे डांबून ठेवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. शेवटी या युवतीने त्याची नजर चुकवून आपले गाव गाठले. घडलेला प्रकार घरी सांगितला. नातेवाईकांनी तिला सोबत घेऊन सोमवारी (ता. 11) भोकर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार तिने पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरुन भोकर ठाण्यात वरील चार जणांवर अपहरण व अत्याचारासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भाले हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com