1200 किलो गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

1200 किलो गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला

मोखाडा : गोहत्या आणि गोमांसला शासनाने बंदी घालण्याचा कायदा केला असलातरी गोहत्या आणि गोमांस वाहतूक, चोरट्या पद्धतीने होत आहे. नाशिक भागातून खोडाळा-मोखाडा मार्गाने चोरट्या पद्धतीने सुमारे 1200 किलो गोमांस नेणारा आयशर टेम्पो मोखाड्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजता पकडून, मोखाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

टेम्पोचालक सलीम अब्दुल कापडे (41) व त्याचा साथीदार अजीम अब्दुल रशीद मोमीन (47) यांना मोखाडा पोलिसांनी अटक केली असून, टेम्पो व गोमांस असा 8 लाख  44 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना जव्हारच्या प्रथमवर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मोखाड्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खोडाळा-मोखाडा मार्गावरील पुलाची वाडी येथे शुक्रवारी रात्री दोन वाजता सुमारे 1200 किलो गोमांस चोरट्या पध्दतीने नेणारा आयशर टेम्पो पकडला. बजरंग दलाचे मोखाडा तालुका प्रखंड ज्ञानेश्वर गांगड, धर्मा भोये, सुरेश वांगड, कान्हा बात्रे, केशव गभाले आणि नरेश गिरंदले यांनी रात्री गस्ती घालून ही कारवाई केली आहे.

या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडून मोखाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तसेच बजरंग दलाचे मोखाडा प्रखंड ज्ञानेश्वर गांगोडे यांच्या तक्रारीवरून मोखाडा पोलिसांनी टेम्पोचालक सलीम अब्दुल कापडे (41) व त्याचा साथीदार अजीम अब्दुल रशीद मोमीन (47) यांना अटक केली असून, टेम्पो 7 लाख व एक लाख 44 हजारांचे गोमांस असा एकूण 8 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना जव्हारच्या प्रथमवर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com