मुंबईत 'जीवघेण्या' पार्ट्या उधळल्या

pub
pub

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांदरम्यान आगीसारख्या अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने मुंबई पालिका आणि अग्निशमन दलाने शहरातील मॉल, हॉटेले, उपहारगृहे तसेच क्‍लबची तपासणी करण्यासाठी चार दिवस मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 337 ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यापैकी 31 ठिकाणी अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील दोन बारमध्ये 27 डिसेंबर 2017 ला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर 27 डिसेंबरपासून ही मोहीम राबवण्यात आली. तपासणी केलेल्या ठिकाणांमध्ये दक्षिण मुंबईतील मफतलाल जिमखाना, विल्सन जिमखाना आणि कॅथलिक जिमखाना तसेच कमला मिल कंपाऊंडमधील बार स्टॉक एक्‍स्चेंजचाही समावेश होता. तळघरात कोणतेही साहित्य ठेवण्याची परवानगी नसताना अनेक ठिकाणच्या बेसमेंटमध्ये मद्य व इतर वस्तू साठवण्यात आल्याचे या कारवाईदरम्यान निदर्शनास आले. 

या छाप्यांदरम्यान 132 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आली असून दोन पार्ट्यांच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. एका आयोजकाला अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. या कारवाईदरम्यान घाटकोपर येथील निलयोग मॉलच्या गच्चीवरील अतिक्रमणही हटवण्यात आल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी सांगितले. 

अशी झाली कारवाई 
दिनांक... पाहणी झालेली ठिकाणे... या ठिकाणांवर कारवाई 
- 27 डिसेंबर ... 62 ...11 
- 28 डिसेंबर .... 164 .... 16 
- 29 डिसेंबर .... 106... 3 
- 30 डिसेंबर .... 45.... 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com