बलात्कारप्रकरणी करण ओबेरॉयला अटक

बलात्कारप्रकरणी करण ओबेरॉयला अटक

मुंबई - अंधेरीतील ३४ वर्षांच्या ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली टीव्ही मालिकांतील कलाकार करण ओबेरॉय याला (४७) ओशिवरा पोलिसांनी काल अटक केली.

पीडित महिलेसोबतच्या शरीरसंबंधांची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने दीड वर्षापासून तिच्याकडून विविध वस्तू व पैसे घेतल्याचा आरोप आहे. व्यवसायाने ज्योतिषी असलेल्या या महिलेची समाजमाध्यमांवरून ओबेरॉय याच्यासोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. ओबेरॉयने लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. जानेवारी २०१७ मध्ये त्याने नारळपाण्यातून गुंगीचे औषध देऊन या महिलेवर बलात्कार केला. त्याने त्या घटनेचे चित्रीकरणही केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com