नऊ दिवसांनी बेस्टला "स्टार्टर'!

मुंबई - विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप बुधवारी मागे घेतल्यानंतर आठवडाभरानंतर बेस्ट बस मुंबईच्या रस्त्यावर आली.
मुंबई - विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप बुधवारी मागे घेतल्यानंतर आठवडाभरानंतर बेस्ट बस मुंबईच्या रस्त्यावर आली.

संप मिटला; कर्मचाऱ्यांना सात हजारांची वेतनवाढ
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात फेब्रुवारीपासून किमान सात हजारांची वाढ होणार असून, वेतन करार आणि बेस्टच्या विलीनीकरणाचाही प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याने बेस्टचा संप मिटल्याची घोषणा कामगार नेते शशांक राव यांनी बुधवारी केली. त्यामुळे नऊ दिवसांनंतर वडाळा आगारातून पहिली बस 3.53 वाजता धावली. संपामुळे कोंडीत सापडलेल्या मुंबईकरांनी यामुळे सुटकेचा निःश्‍वास टाकला.

संपाबाबत सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कामगार संघटनांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर एका तासात संप मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने कामगार संघटनांना दिले. त्यानंतर वडाळा येथील बेस्ट कामगार वसाहतीत मेळावा घेऊन संप मागे घेतल्याची घोषणा राव यांनी करताच कामगारांनी "कामगार एकजुटीचा विजय असो' अशा घोषणा देत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

बेस्टच्या सर्वच आगारांमध्ये हा जल्लोष दिसला. मेळाव्यानंतर त्वरित बेस्टच्या बस रस्त्यांवर आल्या. मेळाव्याला सर्वच कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते. संप मिटल्याची घोषणा कामगार नेते शशांक राव यांनी करताच वडाळ्याच्या आगारातून पहिली 3 वाजून 53 मिनिटांनी धावली. जुनिअर ग्रेड कामगारांसह सर्वच कामगारांच्या वेतनात पुढील महिन्यापासून किमान सात हजार रुपये इतकी वाढ होणार असून, निवृत्त न्यायाधीश एफ. आय. रिबेलो यांची मध्यस्थ म्हणून न्यायालयाने नेमणूक केली असून, तीन महिन्यांत कामगारांच्या प्रलंबित असलेला वेतन करार आणि बेस्टच्या विलीनीकरणाचा प्रश्‍न मार्गी ते लावणार आहे. कामगारांच्या एकजुटीने झालेल्या या ऐतिहासिक विजयाचा तुफान जल्लोष कामगारांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com