लेकरं कडेवर अन् भाजप खासदाराने लावला सामुदायिक विवाह

mass marriage
mass marriage

शहापूर : येथे भाजप खासदार खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघातर्फे भरवण्यात आलेल्या आदिवासी विवाह सोहळ्यात काही जणांची मुले असतानाही आणि काही अल्पवयीन मुलांच्या लग्नास आई-वडिलांची संमती नसताना लग्न लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात आयोजकांवरोधात तक्रार दाखल केली आहे. 

शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे भाजप खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघातर्फे आदिवासी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यातील निम्म्याहून अधिक जोडपे अगोदरच विवाहबद्ध झाले होते. त्यातील काहीजण मुलांना कडेवरती घेऊन विवाहमंडपात दाखल झाले होते. 

शहापूर तालुक्यात आदिवासी अकराशे जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यास आलेले निम्म्याहून अधिक जोडप्यांचा विवाह झाले असल्याचे निदर्शक आले असून काही जोडपी यांच्याकडे होती, आपली लहान चिमुरडी मुलं देखील पहावयास मिळाली.

माझी कोणत्याही प्रकारे संमती न घेता माझ्या मुलाचा विवाह लावून देण्यात आला. जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस मी यांना सांगितले होते की माझ्या मुलाचे लग्न तुम्ही लावू नका आणि तुमचा फॉर्म काढून फेकून द्या. मात्र माझं कोणीही ऐकलं नाही व माझा अल्पवयीन मुलांना जो अठरा वर्षाचा असताना त्याचं लग्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लावून देणारे कुठपर्यंत योग्य आहे. याबाबत मी सांगून पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे एका मुलाच्या आईने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com