कुलाबा येथील इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

कुलाबा येथील इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील ताज हॉटेलजवळील इमारतीला आग लागली. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली. या आगीत एकाचा मृत्यू झाला. तर इतर 10-12 जणांची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. 

​चर्चिल चेंबर या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज दुपारी आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाने इमारतीच्या बाहेरून शिड्या लावून काही रहिवाशांची सुटका केली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या 10-12 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, या आगीमुळे झालेल्या प्रचंड धुरामुळे एकाचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com