मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

railway
railway

मुंबई : मध्य रेल्वेवर कल्याण- विठ्ठलवाडी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या रेल्वेसेवेला फटका बसला आहे. आज (बुधवार) सकाळी ऐन गर्दीच्याच वेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचे कार्यालयाकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वीही अनेकदा मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. मध्यरेल्वे सध्या 15 मिनिटे उशिराने धावत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com