पोलिस अधिकाऱ्यांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षण-लग्नापर्यंतचा खर्च

police.
police.

उल्हासनगर - नाशिक मधील आधारतीर्थ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मुली राहत असून, त्यापैकी एका मुलीला दत्तक घेऊन तिचे शिक्षण ते लग्न असा खर्च करण्याची उल्हासनगरातील मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांनी स्विकारली आहे. डोळस यांच्या या खाकी वर्दीतील माणुसकीला उपस्थितांसह पोलिसांनीही सलाम केला असून आधारतीर्थ आश्रम देखील भारावून गेला आहे.

महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आधारतीर्थ आश्रम हे नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर मध्ये आहे. गणपती उत्सवानिमित्त आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थी उल्हासनगरमध्ये आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे तसेच पोलिस कसे काम करतात ? याची माहिती पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. पोलिसांबद्दल विद्यार्थांना आदर व्हावा तसेच पोलिसांना विद्यार्थी घाबरून जात असतात मात्र पोलिसांना घाबरून न जाता पोलिस हे तुमच्या रक्षणासाठी आहेत, याची जाणीव विजय डोळस यांनी त्या चिमुकल्याना करुन दिली. तसेच पोलिसांना बिनधास्त आपल्या समस्या सांगायच्या असे देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. यावेळी विजय डोळस यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आधारतीर्थ आश्रमात असलेली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अंजली सावंत नावाच्या मुलीला दत्तक घेत असल्याचे यावेळी जाहिर केले. त्या विद्यार्थिनीचा या पुढील संपूर्ण शिक्षण ते लग्नापर्यंतचा खर्च वरिष्ट पोलिस निरीक्षक विजय डोळस यांनी उचलला आहे. तसेच यावर्षी आधारतीर्थ आश्रमातील 13 विद्यार्थी दहावीमध्ये आहेत, ज्या विद्यार्थीना 75 टक्केच्या पुढे मार्क्स पडतील त्यांना देखील पुढील शिक्षणासाठी आपण मदत करणार असल्याचे डोळस यांनी यावेळी जाहिर केले. त्यामुळे खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा समोर आली आहे. डोळस यांनी वरील घोषणा करताच संपुर्ण पोलिस ठाण्यात टाळ्यांचा गडगडाट झाला. याप्रसंगी अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते.सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे आदी यावेळी उपस्थित होते.

माझ्या आई - वडिलांनी शेतीच्या कर्जामुळे आत्महत्या केली, यावेळी पोलिस काका आणि अनेक शासकीय अधिकारी आमच्या घरी आले होते. त्यावेळी पोलिस काकाना बघून मला खुप भीती वाटली होती. मी घरातल्या एका कोपऱ्यात लपुन बसले होते. मात्र आज डोळस काकांना भेटून माझी भीती कायमची नाहीशी झाली आहे. तसेच त्यांनी माझ्या डोक्यावर मदतीचा हात ठेवल्याने मी यापुढे चांगले शिक्षण घेवू शकेल. आणि त्यांच्यासारखी पोलिस अधिकारी होवून समाजासाठी चांगले काम करेन.
अंजली सावंत (आधारतीर्थ आश्रम)

गेल्या दोन वर्षापासुन मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने आधारतीर्थ आश्रमातील मुले आमच्या पोलिस ठाण्यात येतात, मी आणि माझा संपुर्ण स्टाफ मिळून त्या मुलांना तो एक दिवस खुप आनंद देण्याचा प्रयत्न करतो. यापुढे देखील माझ्याकडून जी काही मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत या मुलांना करेल. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस  यांचा आणि त्यांचे सहकारी यांचा आमच्या आधारतीर्थ आश्रमाला खुप मोठा आधार आहे. यावर्षी त्यांनी आमच्या आश्रमातील सर्व मुलांना शाळेत जाण्यासाठी नवीन दप्तर घेवून दिले. तसेच शैक्षणिक साहित्य देखील दिले. 
त्र्यंबकराव गायकवाड (संस्थापक आधारतीर्थ आश्रम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com