विम्यापासुन वंचित बोर्डीतील आठ बागायतदारांचा आक्रमक पवित्रा

विम्यापासुन वंचित बोर्डीतील आठ बागायतदारांचा आक्रमक पवित्रा

बोर्डी  - बँक ऑफ बडोदा बोर्डी शाखेतील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ करभारामुळे प्रधानमंत्री पिक विम्यापासुन वंचित राहिलेल्या बोर्डीतील आठ बागायतदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

थकित विम्याची रक्कम अठरा टक्के व्याजाने मिळावी असा ईशारा बागायतदारांनी दिला आहे. चिकु फळ पिक प्रधानमंत्री हंगामी पीक विमा योजनेत. समाविष्ठ करुन घेतल्यानंतर बँक ऑफ बडोदा शाखेतील आठ खातेदार बागायतदारांनी वीमा घेण्याची कागदोपत्री कार्यवाही 12 जुलै 2016 रोजी कार्यवाही पुर्ण केली होती. परंतु, 13 नव्हेंबर 2016 रोजी वीमा हप्त्यापोटी भरलेली रक्कम तब्बल चार महिन्यानी खात्यात परत जमा झाल्याने बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

या बाबतीत चौकशी केली असता शासनाच्या कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील वीमा कंपनीचा पत्ता चुकिचा असल्याने पैसे परत आले असा खुलासा बँक ऑफ बडोदा बोर्डी शाखेकडून करण्यात आला होता.

दरम्यान, 2016 च्या खरिप हंगामात हवामानात सलग दहा दिवस नव्वद टक्के पेक्षा जास्त आद्रता राहिल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या मार्फत प्रकरणातील सर्व बागायतदारांना वीमा मंजुर झाला परंतु बँक ऑफ बडोदा बोर्डी शाखेतुन आठ बागायतदारांना गेली तीन वर्षे वीमा भरपाई मिळविण्यासाठी संबधित कार्यालयाचे उंबरठे झीझवावे लागत आहेत.

मा.मुख्यमंत्री, फलोद्यान मंत्री, सचिव, विभागिय कृषी अधिकारी, यांच्यासह बँक ऑफ बडोदा विभागिय कार्यालय,बँकेचे लोकपाल यांच्याशी अनेक वेळा पत्रवयवहार केला असुनही प्रतिसाद मिळाला नसल्याने बागायतदार संत्तप्त झाले असून, विम्याची रक्कम अठरा टक्के व्याजाने मिळावी असा ईशारा संबधित आठ बागायतदारांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com