बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला "दिपस्तंभ" पुरस्कार

bordi
bordi

बोर्डी : महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे कार्य केल्याबद्दल येथील बोर्डी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय "दिपस्तंभ" पुरस्कार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात प्रदान करण्यात आला.

मागील पंचविस वर्षे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला पतसंस्था कार्यरत असून हजारो महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा करुन दिलासा दिला आहे. संस्थेने नुकतेच रोप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासोबतच महिलांचे आरोग्य चांगले असावे यासाठी योग साधना शिबिर, आरोग्य शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण शिबिर, शैक्षणिक सहल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पारितोषिक देऊन सन्मान सोहळा साजरा करणे असे विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com