bjp-shivsena
bjp-shivsena

युतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले

मोखाडा-  स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असतांना, युतीची मात्र अधिकृत घोषणा झालेली नसताना, पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. जिल्हयातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मनोर येथे जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन पदाधिकार्यानी सामुहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पालघरात युतीची घोषणा होण्याआधीच रण पेटले आहे. 

राज्यात युतीची सत्ता असताना ही शिवसेनेने सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. हीच स्थिती पालघर जिल्हयात हीच अनुभवयास मिळाली आहे. जिल्हा परिषदेत युती असतानाही विविध समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ही भाजप, सेना आमनेसामने आली होती. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या कारभाराबाबतही शिवसेनेने जिल्हयात विरोधी पक्षांपेक्षाही आक्रमक भूमिका सातत्याने घेतली आहे. ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत ही भाजप सेनेने च  एकमेकांना लक्ष केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकार्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आहे.

दरम्यान, लोकसभा पोटनिवडणूकीत ईरिने दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामे केली आहेत. मात्र, आता राजकीय घडामोडी नंतर शत प्रती शत भाजप आणि स्वबळाची भाषा करणारी शिवसेना यांनी एक पाऊल मागे घेत युती चे संकेत दिले आहेत. वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी गळाभेटी घेऊन युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आणली आहे. मात्र, हे स्थानिक पदाधिकार्यांना रूचलेले नाही. याची ठिणगी प्रथम मुंबईत पडली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांचे निवडणुकीत काम करणार नसल्याची ठाम भूमिका येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतली आहे. तशा बातम्या ही प्रसिद्ध झाल्या आहेत. 

त्यापाठोपाठ पालघरचे भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. युतीची बोलणी पालघरच्या जागेसाठी अडली आहे अशा आशयाच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या तर ही जागा शिवसेनेला सोडली अशी अफवा ही पसरली. त्यामुळे पालघर मधील भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांच्या सह पदाधिकार्यानी तातडीने 17 तारखेला रविवार मनोर येथे बैठक घेऊन, सामुहिक राजीनामा अस्र ऊपसले आहे. ही जागा 1984 पासून भाजप लढत आली आहे.  चार वेळा येथुन भाजप चा खासदार निवडून गेला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच ठेवावी या मागण्यासाठी भाजप पदाधिकार्यानी सामुहिक राजीनामे दिले आहेत. तसेच आता जिल्हा पदाधिकारी ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच पालघरात भाजप - सेने मध्ये रण पेटले आहे. 

पालघर लोकसभेची जागा भाजप कडेच रहावी ही पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. माझ्या अध्यक्षतेखाली काल मनोर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यावेळी सर्व तालुका मंडळ अध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. तर आज जिल्हा कार्यकारीणी सह अन्य पदाधिकारी राजीनामे देणार आहेत. आज मुंबईत मी मुख्यमंत्री देवें

देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शी चर्चा करून राजीनामे सादर करणार आहेत. त्यावर कोअर कमिटी निर्णय घेईल, मात्र, पदाधिकारी या जागेसाठी आग्रही आहेत. 
- पास्कल धनारे, आमदार, भाजप पालघर जिल्हाध्यक्ष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com