मेट्रो-3 कारशेडसाठी हरित लवादाची मंजुरी 

मेट्रो-3 कारशेडसाठी हरित लवादाची मंजुरी 

मुंबई - आरेमधील मेट्रो-3च्या कारशेडसाठी हरित लवादाने मंजुरी दिली आहे. यामुळे 2700 झाडांवर कुऱ्हाड येणार आहे. आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास शिवसेना, मनसेसह काही राजकीय पक्षांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले होते; मात्र हरित लवादाने हिरवा कंदील दिल्याने मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा 33.5 किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 23 हजार कोटी रुपये खर्चाचा मेट्रो रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या "मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'तर्फे राबविला जात आहे. या मेट्रोची कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्यासाठी अडीच हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही पर्यावरणवाद्यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मनसेनेही त्यांना पाठबळ दिल्याने पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या कार डेपोसाठी एमएमआरसीला आरेतील 30 हेक्‍टर जागा देण्यात आली आहे. यापैकी 22 हेक्‍टर जागेत कार डेपो उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आरेतील या जागेवरील सुमारे 3130 झाडे कापावी लागणार होती. उर्वरित जागेतील पाच हेक्‍टरवरील हिरवळ तशीच ठेवण्यात येणार असून, यामुळे 1073 झाडे वाचणार आहेत. 

कामाची अंदाजे किंमत 328 कोटी  
एमएमआरसीने कार डेपो, मेट्रो स्टेशन, वर्कशॉप इमारती आणि मरोळ-मरोशी रस्त्यावरील भुयारी मार्ग तसेच संबंधित कामांसाठी जानेवारी 2017 मध्ये निविदा मागविल्या होत्या. या कामाची अंदाजित किंमत 328 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले होते. हे काम करण्यासाठी एमएमआरसीएने मे. सॅम (इंडिया) बिल्टवेल या कंपनीची नेमणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वी दिल्ली आणि लखनऊ मेट्रोचे काम केले आहे. या कार डेपोमध्ये मेट्रोच्या आठ डब्यांच्या 32 गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com