नायर रुग्णालयतील बंद एमआरआय मशीन सुरु 

Mumbai
Mumbai

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील एमआरयआय मशीनला चिकटून राजेश मारु या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बंद असलेली एमआरआय मशीन पूर्णपणे सुरु करण्यात आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ट्रायल रन सुरु असतानाच बाह्य रुग्ण विभागासाठीही ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यातच नायर रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात बाह्य रुग्ण सेवांसाठी एमआरआय मशीन सेवा सुरु करण्यात आली. 

याबाबत नायर रुग्णालय प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. 31 जुलै रोजी एमआरआय मशीन ट्रायल रन सेवा सुरु करण्यात आली. यासाठी रुग्णालयात दाखल रुग्णांनाच सुरुवातीला ही सेवा करण्यात आली. एक ऑगस्ट रोजी पहिला ट्रायल रन घेण्यात आला. त्या दिवशी अंदाजे केवळ तीनच रुग्णांना ही सेवा मिळाली. मात्र रुग्णालयाच्या अभियांत्रिकी विभागाकडून हिरवा झेंडा मिळाला नसल्याने बाह्य सेवा रुग्णांना ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती. 

तब्बल तीन आठवडयांच्या ट्रायल रननंतर बाह्य रुग्णांसाठीही ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात ही सेवा सुरु करण्यात आली. मात्र नायर रुग्णालय प्रशासनाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली. सध्या केवळ सकाळी आठ ते दुपारी तीन या पहिल्या सत्रातच रुग्णांना एमआरआय मशीनची सेवा मिळत आहे. मारुच्या मृत्यूनंतर पालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सूचनेनुसारच, पहिल्या सत्रातील सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षित करुन ही सेवा सुरु झाली आहे. परंतु इतर दोन सत्रातील एमआरआय सेवा देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचा-यांचीच नेमणून होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत नायर रुग्णालय प्रशासनाने दुसरे सत्र सुरु करण्यासाठी मनुष्यबळच रेडिओलोजी विभागाला अद्याप पुरवले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुस-या सत्रातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देणार कधी, या चर्चांना नायर रुग्णालयात उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com